तेहरीक- ए- तालिबानचा बलुचिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला

तेहरीक- ए- तालिबानचा बलुचिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला

तेहरिक-ए- तालिबान पाकिस्तानच्या एका आत्मघाती हल्लेखोराने पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात रविवारी हल्ला केला. या हल्ल्यात चार सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला आहे; तर २० लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. हा हल्ला क्वेटामधील मस्तुंग मार्गावरील जवानांच्या चेक पोस्टवर झाला.

प्राथमिक तपासानुसार आत्मघाती हल्लेखोराने जवानांच्या गाडीला त्याच्याकडील स्फोटके लादलेल्या मोटारसायकलने धडक दिली, अशी माहिती क्वेटा पोलीस ठाण्याचे उपमहानिरीक्षक अझहर अक्रम यांनी सांगितली. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या माहितीनुसार मोटारसायकलवर सहा किलो स्फोटके होती. चार जवानांचा मृत्यू झाला आहे आणि जखमींपैकी १८ जवान असून दोन सामान्य नागरिक आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते, असेही अक्रम म्हणाले.

हे ही वाचा:

पंजशीरवर कब्जाचा तालिबानकडून दावा

‘पेंग्विन म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी’

…आणि असे झाले ३० कोटींचे ‘बेस्ट’ नुकसान

समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं

तेहरिक-ए- तालिबान या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तेव्हापासून अफगाणिस्तानवर तालिबानची पकड मजबूत झाली आहे, तेव्हापासून पाकिस्तानवर टीटीपीचे हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानने टीटीपीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. याच कारणामुळे ते तालिबानला भेटून टीटीपीच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याची वारंवार मागणी करत आहे.

पंतप्रधान इमरान खान यांनी ट्विटरवर तेहरिक-ए-तालिबानने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त करत जखमींसाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. सुरक्षा जवानांचे त्यांनी त्यांच्या सेवेसाठी आणि ते करत असलेल्या त्यागासाठी आभारही मानले आहेत. बलुचिस्तानच्या गृहमंत्र्यांनी असे हल्ले जवानांचे मनोबल कमी करणार नाहीत.’ असे ट्विटरवर म्हटले आहे.

Exit mobile version