पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी स्फोटात ५६ ठार

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी स्फोटात ५६ ठार

पाकिस्तानमधील पेशावरमधील एका मशिदीत शुक्रवारी ४ मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला. नमाजाच्या वेळी झालेल्या या बॉम्बस्फोटात सुमारे ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या (जुमा) नमाजाच्या वेळी एका आत्मघातकी दहशतवाद्याने गर्दीच्या मध्यभागी स्वतःला स्फोटकांनी उडवून घेतले. या हल्लानंतर एकच खळबळ उडाली. या स्फोटाची माहिती मिळताच पाकिस्तानची सर्व मदत पथके घटनास्थळी रवाना झाले होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्याप हा हल्ला कुणी घडवला याबाबत माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानवर केलेल्या या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशवतादी गटाने स्वीकारलेली नाही. सध्या पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क असून इतर ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे.

हे ही वाचा:

राज्यपालांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना सुनावले

पहिल्या दिवसाअखेर भारताने चढवल्या ३५७ धावा

स्फोटाने हादरले भागलपूर

‘एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण अशक्य’

दरम्यान, तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघांमधील कसोटी मालिकेतील पहिला सामना काल खेळवला जात होता. ज्या ठिकाणी काल स्फोट झाला तिथून १९० किलोमीटर अंतरावर असलेल्या रावळपिंडी येथे हा कसोटी सामना सुरु होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या पाकिस्तानमध्ये राहण्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Exit mobile version