पाकिस्तानमधील कराची येथे गुरुवार, १२ मे रोजी रात्री बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. या बॉम्बस्फोटामध्ये आसपासच्या परिसरात मोठी वित्तहानी झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून तेराहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कराची शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठ परिसरात हा स्फोट झाला. बाजारपेठेत असलेल्या कचराकुंडीच्या शेजारी एका सायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. तसेच आजूबाजूला उभ्या असलेल्या वाहनांना मोठं नुकसान झालं आहे. घरांच्या, हॉटेलच्या काचा फुटल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
मंत्रालयसमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न
ग्यानव्यापीचा सर्वे होणारच! वाराणसी न्यायालयाचा फैसला
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान
उत्तर प्रदेशात मदरशामध्ये गावे लागणार राष्ट्रगीत
या बॉम्बस्फोटात सुमारे दोन किलो स्फोटके आणि सुमारे अर्धा किलो बॉल बेअरिंगचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून हा स्फोट टायमरने घडवण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी सिंध आणि बलुचिस्तानच्या फुटीरतावादी गटांनी स्वीकारली असून कराची पोलिस याला दहशतवादी हल्ला म्हणत आहेत.