काबुल विमानतळावर बॉम्बस्फोट

काबुल विमानतळावर बॉम्बस्फोट

अफगाणिस्तानमध्ये काबुल विमानतळाजवळ दोन बॉम्बस्फोट घडल्याची माहिती मिळत आहे. गुरुवार, २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास हा बॉम्ब हल्ला झाल्याचे समजते. काबूल विमानतळाच्या एका प्रवेशद्वाराजवळ हे बॉम्बस्फोट झाले आहेत. या स्फोटांमध्ये अमेरिकन नागरिक मारले गेल्याची माहिती कळत आहे. एकूण १३ नागरिक या हल्ल्यात मारले गेल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काही बालकांचा ही समावेश होता.

हा बॉम्ब हल्ला सुसाईड बॉम्बिंग प्रकारातील असल्याचे समजते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काबूल विमानतळावर एकच गोंधळ उडालेला दिसला. अमेरिकेच्या पेंटागॉन कडून या बॉम्ब हल्ल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पेंटागॉनच्या दाव्यानुसार या हल्ल्यांमध्ये अमेरिकन नागरिकां सोबतच अफगाणिस्तानचे नागरिकही मारले गेले आहेत. यापैकी एक बॉम्बस्फोट हा काबुल विमानतळाच्या प्रवेशद्वाराशी झाला असून दुसरा हल्ला विमानतळा नजीक असणाऱ्या बॅरोन हॉटेल जवळ झाला आहे. काबुल मधील अमेरिकन दूतावासाचे म्हणणे आहे की काबुल येथे विमानतळावर गोळीबारही करण्यात आला. जेणेकरून अमेरिकन नागरिक यावेळेला प्रवास करून काबुल मधून बाहेर पडू नयेत.

हे ही वाचा:

मंदिर हम खुलवायेंगे…भाजपचा नारा

मला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी

फॅसिस्ट वळणावरचा महाराष्ट्र

काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका

दरम्यान काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका आधीच वर्तवण्यात आला असून अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला होता. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अमेरिकन नागरिकांना गेटच्या बाहेर असणाऱ्या सुरक्षा धोक्यांमुळे विमानतळावरून प्रवास करू नये किंवा जमू नये, असा सल्ला दिला होता. तर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले होते की, एबी गेट, ईस्ट गेट किंवा नॉर्थ गेटवर उपस्थित असलेल्या लोकांनी आता त्वरित निघून जावे.

Exit mobile version