खलिस्तानी समर्थक, पंजाबी गायक शुभला ‘बोट’ने ठरविले अशुभ!

आम्ही प्रथम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खरे भारतीय ब्रँड आहोत, असे बोटने सुनावले

खलिस्तानी समर्थक, पंजाबी गायक शुभला ‘बोट’ने ठरविले अशुभ!

‘आम्ही खरे भारतीय ब्रँड आहोत,’ असे जाहीर करून बोट कंपनीने कॅनडास्थित पंजाबी गायक शुभच्या भारतीय दौऱ्याला दिलेले प्रायोजकत्व काढून घेतले आहे. कंपनीने ‘एक्स’ या सोशल मीडियावर याबाबतचे निवेदन जाहीर केले आहे. या गायकाने याच वर्षी भारताचा फेरफार केलेला नकाशा प्रसिद्ध केला होता.

 

शुभ या नावाने लोकप्रिय असणाऱ्या या २६ वर्षीय गायकाचे मुंबईतील कॉर्डेलिया क्रुझेस येथे २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्येही पुढील काही दिवस त्याचे गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत. मात्र त्याच्या भारताच्या दौऱ्याचे प्रायोजक असणाऱ्या बोट कंपनीने या कार्यक्रमातून माघार घेतली आहे.

 

 

‘अतुलनीय संगीत समुदायाप्रती आमची बांधिलकी घट्ट असली तरी, आम्ही प्रथम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खरे भारतीय ब्रँड आहोत. त्यामुळेच जेव्हा आम्हाला या वर्षाच्या सुरुवातीला कलाकार शुभने केलेल्या टीकेची जाणीव झाली, तेव्हा आम्ही या दौऱ्यातून आमचे प्रायोजकत्व मागे घेण्याचा निर्णय घेतला,’ असे बोट कंपनीने ‘एक्स’वर जाहीर केले आहे. ‘भारतात एक उत्कृष्ट, टवटवीत संगीत संस्कृती वाढवण्यास नेहमीच प्रोत्साहन देऊ आणि उदयोन्मुख कलाकार त्यांची प्रतिभा दाखवू शकतील, असे व्यासपीठ तयार करू,’ असे कंपनीने नमूद केले आहे.

हे ही वाचा:

कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता

कॅनडातल्या भारतीयांनो खबरदारी घ्या…भारताकडून आवाहन

अमेरिकेतले संसद सदस्य फेटरमन आले चक्क हाफ पॅन्टमध्ये !

३५ हजाराहून अधिक महिलांकडून अथर्वशीर्षाचे पठण

 

शुभ या गायकाने नुकतेच भारताचा फेरफार केलेला नकाशा प्रसिद्ध केला होता. त्यामुळे त्याच्यावर खलिस्तानी फुटीरवाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुभच्या कार्यक्रमाचे पोस्टर फाडून टाकले होते. ‘भारताच्या अखंडतेचे आणि एकात्मतेचे शत्रू असणाऱ्या खलिस्तानींसाठी येथे कोणतीही जागा नाही,’ असे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष ताजिंदर सिंग तिवाना यांनी स्पष्ट केले होते.

 

 

‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असणाऱ्या, मुंबईत आम्ही कॅनडाच्या गायकाचा कार्यक्रम होऊ देणार नाही. याबाबत योग्य कारवाई केली न गेल्यास आयोजकांना आमच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

Exit mobile version