मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरच्या अंतिम मुदतीत एका आठवड्याने वाढ

मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरच्या अंतिम मुदतीत एका आठवड्याने वाढ

मुंबईतील वाढत्या कोविडचा प्रभाव लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढले होते. त्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (इओआय) भरण्याची अंतिम दिनांक काल (१८ मे रोजी) उलटून गेली. कालपर्यंत महानगरपालिकेकडे केवळ तीन प्रस्ताव आले आहेत. तीनही प्रस्ताव रशियाच्या स्पुतनिक लसींसाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने २५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेला लसींच्या पुरवठ्याच्या जागतिक इओआयसाठी केवळ तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे तीनही प्रस्ताव रशियाच्या स्पुतनिक लसींसाठी देण्यात आले आहेत. परंतु अजून ही अधिकृत निविदा नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

दहा कंपन्यांना लस बनवण्याचे लायसन्स द्या

‘लस- पर्यटनात’ भारतीयांची रशियाला पसंती

पश्चिम किनारपट्टीनंतर आता पूर्वेला वादळाचा फटका?

मराठा आरक्षण: भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांना भेटून बाजू मांडावी

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलासरू यांनी सांगितले की,

आम्ही एक आठवड्याने मुदतवाढ दिली आहे. आम्हाला आत्तापर्यंत तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तीनही स्पुतनिक लसींसाठी देण्यात आली आहे. त्यांना काही कागदपत्रांची पुर्तता करायची आहे. त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये कोविडचा प्रभाव वाढू लागला होता. लसीकरणात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी पालिकेने जागतिक इओआय मागवला होता. यामध्ये १ कोटी लस खरेदी करण्यासाठी हा इओआय काढण्यात आला होता. या इओआयमधून चीनला वगळण्यात आले होते. त्याबरोबरच जर भारतात परवानगी नसलेल्या एखाद्या लसीसाठी इओआय भरला तर त्याची परवानगी केंद्र सरकारकडून घेण्याची जबाबदारी पुरवठादारावर ठेवण्यात आली होती. इओआयनंतर खऱ्या अर्थी निवीदा प्रक्रियेला सुरूवात केली जाऊ शकेल.

Exit mobile version