पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या पिशीन जिल्ह्यात एक बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. एका बाजारपेठेत झालेल्या या बॉम्बस्फोटामध्ये दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर पोलीसही जखमी झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानमधील वृत्तसंस्था डॉन यांनी या संदर्भात वृत्त दिले आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तानयेथील पिशीन जिल्ह्यात एका बाजारपेठेत मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोन मुले आणि एक महिला ठार झाली आहे. तर, दोन पोलिसांसह १३ लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दखल करण्यात आले आहे. पाच जखमींची प्रकृती गंभीर असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
पिशीन सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) मुजीबूर रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जखमी पोलिसांची प्रकृती चिंताजनक आहे. एसएचओ रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटक साहित्य मोटरसायकलमध्ये पेरण्यात आले होते. परिणामी तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. दहशतवादविरोधी विभाग (CTD) आणि बॉम्ब निकामी पथक तपासासाठी पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
कोलकाता : हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याच्या घरी सीबीआयचा छापा !
“मविआचे सरकार गडगडायला नाना पटोले जबाबदार”
टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव यांना अटक
आशिष शेलारांच्या पीएच्या नावाने फसवणूक करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
राज्य प्रसारक पीटीव्ही न्यूजनुसार, पिशीनच्या उपायुक्त कार्यालयाजवळ हा स्फोट झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेची निंदा केली आहे. रेडिओ पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, “लहान मुलांवर हल्ला करणारे भ्याड दहशतवादी मानव म्हणण्यास पात्र नाहीत.” त्यांनी जखमींना शक्य तितके सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आणि या घटनेला जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांना अनुकरणीय शिक्षा देण्याचे आवाहन केले.