पाकिस्तानमध्ये शुक्रवारी मोठा बॉम्बस्फोट झाला असून यात शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण स्फोटात पाच शाळकरी मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बहुतांश शाळकरी मुलांचा समावेश आहे. हा हल्ला रिमोट कंट्रोल बॉम्बच्या सहाय्याने करण्यात आल्याची माहिती आहे. दक्षिण पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील सिव्हिल हॉस्पिटल चौकात हा स्फोट झाला.
माहितीनुसार, मस्तुंग जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल चौकातील हायस्कूलजवळ सकाळी ८.३५ वाजता रिमोट-नियंत्रित बॉम्बस्फोटात पोलीस व्हॅनला टार्गेट करण्यात आलं. स्फोटात आयईडी (इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) वापरण्यात आलं होतं. शाळेजवळ उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले होते. यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून पाच शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यात २२ जण जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूच काम करतील’
१८ हिंदुंवर देशद्रोहाचा गुन्हा !
ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेतील हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन
मुस्लिम पुरुषाने हिंदू असल्याचे भासवून हिंदू महिलेशी केले लग्न
सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या स्फोटात एक पोलीस व्हॅन आणि अनेक ऑटो रिक्षांचे नुकसान झालं. आरोग्य विभागाच्या प्रवक्त्याचा हवाला देत रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, स्फोटानंतर क्वेटाच्या सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे आणि सर्व डॉक्टर, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे. पाकिस्तानमधील अशांत प्रांत म्हणून ओळख असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये हा हल्ला झाला.