27 C
Mumbai
Tuesday, December 31, 2024
घरक्राईमनामाकाबूल मोठ्या स्फोटाने हादरले, तिन्ही हल्लेखोर ठार

काबूल मोठ्या स्फोटाने हादरले, तिन्ही हल्लेखोर ठार

सर्वांना सुखरूप बाहेर काढले

Google News Follow

Related

अफगाणिस्तानातील परदेशी नागरिकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी, काही अतिरेक्यांनी मध्य काबुलमधील शहर-ए-नवा हॉटेलवर गोळीबार केला, असे दोन तालिबान सूत्रांनी  सांगितले. इमारतीमध्ये स्फोटाचा आवाजही ऐकू आला. , स्फोट खूप जोरदार होता आणि अनेक गोळ्याही झाडल्या. काही हल्लेखोर हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी सतत गोळीबार केला असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तालिबानचे प्रवक्ते जबिउल्ला यांनी ट्विट करून तिन्ही हल्लेखोर ठार झाल्याची माहिती दिली आहे.

जबिउल्लाहने ट्विटमध्ये लिहिले की, ‘काबूलमधील हॉटेलमध्ये हल्ला झाला. तिन्ही हल्लेखोर ठार झाले आहेत. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. खाली उडी मारल्याने केवळ दोन जण जखमी झाले. काबुलमध्ये चिनी व्यावसायिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या गेस्ट हाऊसजवळ हा स्फोट झाला. स्फोटानंतर हवेत सर्वत्र धुळीचे लोट उडताना दिसत होते.इमारतीचा पहिला मजला आगीत जळून खाक झाला आहे, या इमारतीत काही परदेशी लोक राहत होते. या हॉटेलला चायनीज हॉटेल असे म्हणतात कारण चीनचे वरिष्ठ अधिकारी येथे वारंवार ये-जा करतात.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर गोळ्या झाडत हॉटेलमध्ये घुसले. यानंतर तेथे स्फोट झाला. इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत या हल्ल्यामागे असल्याचे मानले जात आहे. अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

अलिकडच्या काही महिन्यांत अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील परदेशी सैन्याने माघार घेतल्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये सत्ता ताब्यात घेतलेल्या इस्लामिक तालिबानने त्यांचे लक्ष देशातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यावर असल्याचे म्हटले आहे. .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा