काबुलमध्ये आत्मघाती स्फोटात १९ मृत्युमुखी

काबुलमध्ये आत्मघाती स्फोटात १९ मृत्युमुखी

अफगाणिस्तानच्या राजधानी शहरात काबूलमध्ये आज (२ नोव्हेंबर) भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर झालेला हा स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, घटनास्थळावरून गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. रूग्णालयाजवळच्या परिसरातही स्फोट झाल्याचे अफगाणिस्तानमधील माध्यमांनी सांगितले.

दरम्यान, तालिबानकडून शहरात झालेल्या स्फोटाबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून काबूलमध्ये सातत्याने स्फोट होत आहेत. यातील काही बॉम्बस्फोट हे इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या संघटना करत आहेत. मात्र, लवकरच इस्लामिक स्टेटवर मात करून देशात शांतता प्रस्थापित करू, असे तालिबानकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

भारतीयांना इस्रायलची मैत्री बहुमूल्य

जगाचा दबाव झुगारून भारताने ठरवले २०७० चे लक्ष्य

धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!

‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’

ऑक्टोबरच्या सुरुवातील काबुलमधील एका मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ स्फोट होऊन शेकडो लोक त्यामध्ये जखमी झाले होते. तेव्हा झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही कोणत्या दहशतवादी संघटनेने घेतली नव्हती मात्र तो स्फोटही इस्लामिक स्टेट खुरासान या दहशतवादी संघटनेने घडवून आणला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

Exit mobile version