अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरूच; मदरशातील स्फोटाने घेतले १८ बळी

१८ जण ठार,३६ जखमी

अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरूच; मदरशातील स्फोटाने घेतले १८ बळी

अफगाणिस्तानातील स्फोटांची मालिका थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही . उत्तर अफगाणिस्तानमधील एका मदरशात मोठा स्फोट झाला आहे . या स्फोटात १८जणांचा मृत्यू झाला असून ३६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर अफगाणिस्तानमधील समंगन प्रांताची राजधानी ऐबक ३० नोव्हेंबर रोजी स्फोटाचे लक्ष्य बनले. तेथील एका मदरशात नमाज पढल्यानंतर अचानक मोठा आवाज झाला. मदरशातील विद्यार्थ्यांशिवाय इतर लोकही प्रार्थनेसाठी जमले होते. स्फोट होताच तेथे चेंगराचेंगरी झाली, मात्र लोकांना समजेल तोपर्यंत तेथे मृतदेह पडले होते.
प्राथमिक माहितीनुसार,१८ जणांचा जागीच मृत्यू झाला .

मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. ३६ जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.अधिकारी आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे की यापैकी आणखी काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इतर जखमींमध्ये बऱ्याच जणांना आयुष्यभर अपंगत्वाचा फटका सहन करावा लागला आहे.

हे ही वाचा : 

सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक

नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका

शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार

राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब

मृतांपैकी बहुतेक मदरशाचे विद्यार्थी

स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक मदरशाचे विद्यार्थी असल्याचे म्हटल्या जात आहे. . स्फोटाची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक मदरशामध्ये पोहोचले असता, हाहाकार माजला. आतापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कोणीही घेतली नसून, इस्लामिक स्टेटच्या स्थानिक विभागाने हा स्फोट घडवून आणला असावा, असे मानले जात आहे. तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून, इस्लामिक स्टेटच्या स्थानिक मॉड्यूलद्वारे वारंवार स्फोट घडवून आणले जात आहेत.

Exit mobile version