बॉल समजून बॉम्बशी खेळली; तृणमूल नेत्याचे घरच पोळले, भाचीचा मृत्यू

मिनाखा येथील घरात बॉम्ब ठेवला होता

बॉल समजून बॉम्बशी खेळली; तृणमूल नेत्याचे घरच पोळले, भाचीचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील टीएमसी नेते कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. यावेळी तृणमूल काँग्रेस नेते अबू हुसैन गायन यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी गायन यांना अटक केलेले प्रकरण अत्यंत गंभीर आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते अबू हुसैन गायन यांनी पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मिनाखा येथील घरात बॉम्ब ठेवला होता. मुले तो बॉल आहे असे समजून त्याच्याशी खेळू लागली. इतक्यात त्याचा स्फोट होऊन एका मुलीचा मृत्यू झाला.

तृणमूल नेते अबू हुसैन गायन यांचे नातेवाईक बुधवारी संध्याकाळी ६ वाजता भेटण्यासाठी आले होते. त्याची ८ वर्षांची दुसऱ्या इयत्तेत शिकणारी भाची झुमा खातून बॉम्बही खेळत होती. खाली पडून बॉम्ब फुटला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रश्न असा आहे की, तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने बॉम्ब का ठेवला? की यामागे राजकीय षडयंत्र आहे? यामागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. पंचायत निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बॉम्ब पेरले होते का, याचाही पोलीस अधिकारी तपास करत आहेत.

हे ही वाचा : 

‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’

आम्हाला परिवार नाही का? करमुसेंचा आव्हाड यांना सवाल

११ वर्षे सावरकरांसारखा यातना भोगणारा काँग्रेसचा नेता दाखवा!

धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना

अबुल गायन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. गावात तणावाचे वातावरण पाहता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तृणमूल नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याच्या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version