कोरोनाची जन्मभूमी चीनमध्येच पुन्हा कोरोनाचे थैमान

कोरोनाची जन्मभूमी चीनमध्येच पुन्हा कोरोनाचे थैमान

संपूर्ण जगाला कोरोना विषाणूचा प्रसाद देणाऱ्या चीनमध्येच कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. चीनचा दक्षिण पूर्व प्रांत फुजियान मधील पुतियान या शहरात यामुळे चित्रपटगृह, जिम, हायवे बंद करण्यात आले आहेत. तर, शहरातील नागरिकांना शहर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या वाढल्यानं पुतियान शहरात हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुतियान शहरातील स्थानिक मीडियानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार फुजियानमधील पुतियान शहरात कोरोनाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचे नवे रुग्ण वाढत असल्यानं तिथं निर्बंध लादण्यात आले आहेत. पुतियान शहराची लोकसंख्या ३२ लाख आहे. कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता चीनच्या राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेनं एक तज्ज्ञांची टीम पुतियानमध्ये पाठवली असून शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माहितीनुसार फुजियामध्ये १० ते १२ सप्टेंबरमध्ये कोरोनाचे ४३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३५ रुग्ण पुतियानमनध्ये आढळले आहेत. याशिवाय कोरोनाची कोणतीही लक्षणं नसणारे ३२ रुग्ण गेल्या ४ दिवसांमध्ये आढळून आले आहेत. मात्र, चीनमध्ये ज्या व्यक्तींच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळत नाही त्यांची मोजणी केली जात नाही.

हे ही वाचा:

आयफोन १३ लॉंच, काय आहेत नवीन फीचर्स?

दोन दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव अर्ध्यावर?

पाकिस्ताननेच आम्हाला अफगाणिस्तानमध्ये फसवले

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांत मुंबईतला जान मोहम्मद

१२ सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये ९५ हजार २४८ कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळले होते. तर, ४६३६ जणांचा मृत्यू झाला होता. चीनमध्ये यापूर्वी जियांग्सूमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट पाहायला मिळाला होता. गेल्या दोन आठवड्यापूर्वी तिथली रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. आता तिथं नवे रुग्ण आढळून येत नाहीत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चीनच्या पुतियानमध्ये आढळलेले रुग्ण हे डेल्टा वेरिएंटचे असल्याचं समोर आलं आहे.

 

Exit mobile version