पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छासंदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छासंदेश

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातून शुभेच्छासंदेश देण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील लोकांनी ट्विटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान मोदी यांना ट्विटरवरून शुभेच्छा देत त्यांना दीर्घायुष्य चिंतिले आहे. आपण अशीच अहर्निश राष्ट्रसेवा करत राहा, असे राष्ट्रपती यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, नरेंद्र मोदी यांनी देशाला एक नवा विचार दिला. भविष्याचा वेध घेण्याचा आणि परिश्रमाची पराकाष्ठा करण्याचा विचार त्यांनी भारतीयांसमोर मांडला आहे.

नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० ला गुजरातमधील वडगाव येथे झाला. अगदी लहानपणआपासूनच मोदी यांनी आपले जीवन समाजकार्याला समर्पित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ते भाजपाचे नेते असा प्रवास करत ते आज भारताचे सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान म्हणून गौरविले गेले आहेत. जागतिक स्तरावरही सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांत ते अग्रणी आहेत.

मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर, तडाखेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनीही पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा आणि समर्पण ही मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. पुढील २० दिवस ही मोहीम चालणार आहे.

Exit mobile version