आंध्र प्रदेशातील पक्षी गणनेला सुरूवात

आंध्र प्रदेशातील पक्षी गणनेला सुरूवात

दोन दिवसांच्या आशियाई पाणथळ जमिनीवरील पक्ष्यांच्या गणनेला प्रारंभ झाला आहे. ही गणना बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस)च्या तज्ञांच्या देखरेखीखाली चालू करण्यात आली आहे. यासाठी सुमारे कोरिंगा अभयारण्य, कोल्लुरू तलाव आणि कृष्णा अभयारण्य यांच्यासह डझनभर स्थळांची निश्चीती करण्यात आली आहे.

बीएनएचएसचे सहाय्यक निर्देशक पी. सथीयसेल्वम, एस.सिव कुमार आणि बीएनएचएसचे आंध्र प्रदेशचे समन्वयक के.मृत्युंजय राव यांनी अनेक हौशी पक्षीनिरीक्षकांचे प्रशिक्षण घेतले. त्यात त्यांना पक्षी गणनेत येऊ शकणाऱ्या अडचणी, तांत्रिक बाबी यांबाबत सांगण्यात आले.

डॉ. सथीयसेल्वम यांनी यापूर्वी गोदावरी खाजणातील पक्षी वैविध्यावर काम केले आहे. त्यावेळी त्यांनी ९० पक्षी प्रजाती शोधल्या होत्या. गोदावरी खाजणातील १२ स्थळे सध्याच्या पक्षीगणनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

“अजून पक्षीनिरीक्षकांची गरज आहे. पक्षीनिरीक्षणातून जेवढे अधिक निष्कर्ष काढता येतील तेवढे पक्षी संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक आहेत. भविष्यातील पाणवठ्यांवरील आणि पाणथळ जागेवरील पक्ष्यांच्या संवर्धनासाठी हे आवश्यक आहे.” असे सथीयसेल्वम यांनी सांगितले.

याभागात आढळणारा विलुप्त होऊ शकणाऱ्या प्रजातींपैकी असलेल्या एक इंडियन स्कीमर या पक्ष्याचा अधिक अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आंध्र प्रदेशच्या काकिनाडा बंदराच्या प्रदेशात हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतो.

गोदावरी खाजणाच्या प्रदेशातील कारोमंडल इंडस्ट्रियल एरियाच्या जवळच्या दलदलीच्या प्रदेशाचा समावेश केला आहे.

विशाखापट्टण, राजमहेंद्रवरम् आणि काकिनाडा येथील पक्षी निरीक्षक गोदावरी खाजण प्रांतात पक्षी निरीक्षणाच्या कामासाठी वापरण्यात आले आहेत.

Exit mobile version