देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर देशातून आणि जगभरातून या दुर्घटनेवर शोक व्यक्त करण्यात आला. मात्र, चीनने या घटनेबद्दल गरळ ओकली आहे. भारताच्या लष्करात, सैन्य दलात त्रुटी असल्याचे सांगत अशा दुःखद वेळीही चीनने भारतविरोधी आपले खरे रंग दाखवले आहेत.
चीन कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’मधून चीनने आपले रंग दाखवले आहेत. ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये म्हटले आहे की, या अपघातासाठी भारतीय सैन्यातील त्रुटी जबाबदार आहेत. शिवाय हा अपघात म्हणजे भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाला मोठा धक्का असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. बिपीन रावत यांना त्यांनी चीन विरोधी असल्याचेही म्हटले आहे.
हे ही वाचा:
बिपीन रावत यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र सदनातील खोलीत भुजबळ बंद!
दरम्यान, यावरून चीन विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचे माजी लष्करप्रमुख वेद मलिक यांनी चीन नैतिकताही विसरला, असल्याचे म्हटले आहे. सामाजिक नैतिकता आणि मूल्यांची चीनकडे खूप कमी आहे. अशात आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करु शकतो, अशा शब्दात निवृत्त जनरल व्ही. पी. मलिक यांनी संताप व्यक्त केला आहे.
तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर आज शुक्रवारी १० डिसेंबर रोजी दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.