भारताचे तिन्ही दलांचे पहिले संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी एका भाषणात भारतीय सैनिकांना जे पाच शब्द, जी पाच तत्त्वे लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते सांगितले होते, त्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांचे हे शब्द पुन्हा प्रत्येक सैनिकाच्या कानात घुमू लागले आहेत.
त्या भाषणात बिपिन रावत म्हणाले होते की, कोणताही सैनिक जेव्हा आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये नव्या नियुक्तीवर जातो, तेव्हा त्यांचे प्रशिक्षक त्यांच्या मनावर काही विचार कोरत असतात. हे विचार त्यांनी कायम आपल्या सोबत ठेवावेत, अशी शिकवण प्रशिक्षकांकडून या सैनिकांना दिली जात असते.
प्रत्येक जवानाला हे शिक्षण दिले जाते की, जे कार्य तुम्ही करणार आहात या पाच शब्दांना तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ते कधीही विसरता कामा नये. ते शब्द म्हणजे नाम, नमक, निशान, वफादारी आणि इज्जत.
हे ही वाचा:
काँग्रेस लढून थकला आहे; तृणमूल हीच खरी काँग्रेस
स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी दहा दहा खटले अंगावर घेऊ
मोदींनी बोलवली महत्वाची सुरक्षा विषयक बैठक
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन
जनरल बिपिन रावत त्या भाषणात म्हणतात की, या पाच तत्त्वांवर एका सैनिकाचा पाया रचला जातो. हे शब्द इतक्या खोलवर त्याच्या मनात रुजवले जातात की त्याला कर्तव्याचे पालन करताना या तत्त्वांना लक्षात ठेवून त्याला पुढे जायचे असते. जोपर्यंत हे पाच शब्द भारतीय सैनिक लक्षात ठेवतील तोपर्यंत भारतीय सैन्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्याला नष्ट केले जाईल.