इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात संघर्ष सुरू असून इस्रायली सैन्य हिजबुल्लाच्या अनेक ठिकाणांना वारंवार लक्ष्य करत आहे. अशातच आता इस्रायली लष्कराने सोमवारी दावा केला की, त्यांनी हिजबुल्लाच्या तळावर प्रवेश मिळवला आहे जिथे ५० कोटी डॉलर्स किंमतीची रोकड आणि सोने लपवले होते. रविवारी रात्री इस्रायली हवाई दलाने हिजबुल्लाच्या आर्थिक मालमत्तेला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यानंतर हा खुलासा करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आता लेबनॉन आणि इराणविरुद्ध सुरू झाला आहे. नुकतीच इस्रायलने धडक कारवाई करत गाझामधील हमासचा म्होरक्या याह्या सिनवार आणि बेरूतमधील हिजबुल्ला दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हसन नसरल्ला या दोघांचाही खात्मा केला आहे. यानंतर आता इस्रायली संरक्षण दलाने हिजबुल्लाच्या आर्थिक केंद्राविषयी गुप्तचर माहिती उघड केली आहे. नसरल्ला ठार झाला त्या बंकरमध्ये कोट्यवधी डॉलर्सची रोकड आणि सोने असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
“Tonight, I am going to declassify intelligence on a site that we did not strike—where Hezbollah has millions of dollars in gold and cash—in Hassan Nasrallah’s bunker. Where is the bunker located? Directly under Al-Sahel Hospital in the heart of Beirut.”
Listen to IDF Spox.… pic.twitter.com/SjMZQpKqoJ
— Israel Defense Forces (@IDF) October 21, 2024
हिजुबुल्लाचे गुप्त बंकर हे लेबनॉनची राजधानी बैरुत शहराच्या मध्यभागी अल सहेल हॉस्पिटलच्या खाली आहेत. हसन नसरल्लाचा बंकर होता, जिथे कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोकड आहे. इस्त्रायल सैन्य दलाचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी म्हटलं आहे की, आज मी एका ठिकाणाविषयी सार्वजनिक गुप्तचर माहिती देत आहे. दक्षिण बेरूतमधील अल सहेल हॉस्पिटलच्या खाली असलेल्या या बंकरमध्ये आमच्या अंदाजानुसार ५० कोटी डॉलर्सची रोकड आणि सोने आहे, इस्रायली सैन्याने हिजबुल्लाच्या या आर्थिक लक्ष्यांवर अचूक हल्ले केले. कडेकोट सुरक्षा असलेले गुप्त ठिकाण लक्ष्य होते. येथे एक भूमिगत तिजोरी आहे, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आणि सोने ठेवण्यात आले होते. हिजबुल्ला हा पैसा इस्रायलवर हल्ला करण्यासाठी वापरत होता,” असा दावाही त्यांनी केला आहे.
हे ही वाचा:
रशियन सैन्यात सहभागी असलेल्या ८५ भारतीयांची सुटका
पंतप्रधान मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी राशियाला रवाना
‘चुकून पाठवला मेसेज’, ५ कोटीची मागणी करत धमकी देणाऱ्याने सलमानची मागितली माफी!
उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध
इस्रायलने लेबनॉनसह आंतरराष्ट्रीय संस्थांना हिजबुल्लाला दहशतवादाला निधी देण्यासाठी आणि इस्रायलवर हल्ला करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे. तसेच इस्त्रायलचे युद्ध लेबनीज लोकांशी नसून हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेशी आहे. आम्ही हॉस्पिटलवर हल्ला करणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.