कीवमधील भारतीयांसाठी सर्वात मोठा अलर्ट

कीवमधील भारतीयांसाठी सर्वात मोठा अलर्ट

रशिया युक्रेनचे गेल्या सहा दिवसापासून युद्ध सुरुच आहे. रशियन सैन्य मिळेल त्या मार्गाने कीवच्या दिशेने जात आहे. आज रशियन सैन्य कीव शहरापासून फक्त २५ किमी दूर आहे. त्यामुळे आज कधीही कीव शहरात मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. म्हणून भारतीय दूतावासाने कीवमधील भारतीयांना सर्वात मोठा अलर्ट दिला आहे.

भारतीय दूतावासाने कीवमधील भारतीयांना कीवमधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी मोहीम तीव्र करत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीयांना बाहेर काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन गंगा’मध्ये हवाई दलाला सहभागी होण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले आहेत. यापूर्वी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया, निवृत्त जनरल व्ही.के सिंह, हरदीप सिंग पुरी आणि किरेन रिजिजू यांना या मोहिमेत सामील होण्यास सांगितले होते.

‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत आतापर्यंत युक्रेनमधून जवळपास १ हजार ५०० लोकांना भारतात आणले आहे. भारत सरकार हंगेरी, पोलंड, स्लोव्हाकियासह पाच देशांमधून आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याचे काम करत आहे. C-17 ग्लोबमास्टर विमानाद्वारे लोकांना भारतात आणले जाणार आहे.

हे ही वाचा:

शार्क टँक इंडिया फेम ‘भारत पे’चे सह- संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पायऊतार

‘भारतीयांना मायदेशात परत आणण्याची मोहीम काय शिवसेनेने सुरू केली का?’

शार्क टँक इंडिया फेम ‘भारत पे’चे सह- संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पायऊतार

युक्रेनला भारताकडून मदतीचा हात

दरम्यान, आज कीवमध्ये काहीही होऊ शकते, रशियन सैन्य कीवपासून काही अंतरावरच आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या नागरी वस्त्यांवरदेखील हल्ला करत आहे. युक्रेनवर चारी बाजूने हल्ला सुरु असून आता रशियाने युद्धासाठी पाणबुडीचा वापर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. युद्धाची तीव्रता वाढत असून रशियन सैन्याने खारकीवमध्ये सरकारी कार्यालयावर मिसाईल हल्ला केला आहे.

Exit mobile version