सुरक्षा दलाला मोठे यश, तीन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक

तिन्ही दहशतवाद्यांना संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे.

सुरक्षा दलाला मोठे यश, तीन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक

दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. काश्मीरमध्ये पसरलेल्या दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी लष्कर, पोलीस आणि इतर सुरक्षा दल एकजुटीने काम करत आहेत. अनंतनाग जिल्ह्यात तसेच काश्मीरच्या इतर भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी श्रीनगरच्या बाहेर तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

काश्मीर झोन पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, तिन्ही दहशतवाद्यांना संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. ते म्हणाले की, लष्कराच्या २ आरआर आणि श्रीनगर पोलिसांनी श्रीनगरच्या बाहेरून अटक केलेल्या ३ दहशतवाद्यांकडून ३ एके रायफल, २ पिस्तूल, ९ मॅगझिन जप्त केल्या आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.रविवारी सुरक्षा दलांनी  शस्त्रांच्या मोठ्या साठ्यासह तीन दहशतवाद्यांना अटक केली.

हे ही वाचा : 

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

श्रीनगरच्या बाहेरील लवापोरा येथे राष्ट्रीय महामार्गावर शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी एक टाटा मोबाइल वाहन तपासणीसाठी थांबवले होते. या वाहनाची झडती घेताच तिथून तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून या तीन दहशतवाद्यांना शालातनाग पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिघांविरुद्ध एकाच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. रविवारी सकाळी काश्मीर विभागातील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये जवानांनी एक दहशतवादी मारला. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव  कुलगाम येथील सज्जाद असे आहे.

Exit mobile version