अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गानी यांचा राजीनामा

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गानी यांचा राजीनामा

अफगाणिस्तानच्या राजधानीत काबुलमध्ये तालिबानींनी शिरायला सुरूवात केली आहेच. विविध ठिकाणाहून काबुल आपल्या ताब्यात घ्यायला तालिबानने सुरूवात केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान हिंसक कालखंडाच्या उंबरठ्यावर असतानाच, तिथे सत्तांतर संभावत आहे.

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गानी यांनी राजीनामा दिला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शिरकाव केल्यानंतर आता सत्ता ताब्यात घेतल्याची घोषणा करण्याची औपचारिकता शिल्लक असल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गानी यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. तालिबानचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनाकडे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जात असल्याचे वृत्त आहे.

काबुलमध्ये शिरकाव होत असताना तालिबानकडून निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार, सामान्य अफगाण नागरीक आणि लष्कराविरोधात कोणतीही कारवाई करणार नसल्याचे वचन देत आहोत. तालिबान त्या सगळ्यांना माफ करत असून सर्वांनी घरातच थांबावे आणि कोणीही देश सोडून जाऊ नये अशी धमकी वजा सूचनाही तालिबानने दिली. काबूल शहरात तालिबानी फौजांनी शिरकाव न करण्याची सूचना देण्यात आल्याचे तालिबानने निवदेनात म्हटले.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात सत्तांतर होणार?

…आणि डॉक्टरच्या खात्यातून गायब झाले पैसे

पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

तालिबानसमोर अफगाणिस्तान सरकारने शरणागती पत्करली असल्याचे वृत्त समोर आले आहे. तालिबानने सत्ता हस्तांतरणाची मागणी केली आहे. तालिबानची ही मागणी कार्यवाहक गृह मंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी मान्य केल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी म्हटले की, काबुलवर हल्ला होणार नाही. सत्तांतर शांततेने होणार आहे. काबुलच्या सुरक्षितेची जबाबदारी सुरक्षा दलाकडे आहे.

शनिवारी, तालिबानने मजार-ए-शरीफ आणि जलालाबाद या महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला होता. जलालाबादवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने राजधानी काबूलचा इतर प्रांताशी संपर्क तोडला. जलालाबादच्या राज्यपालांनीदेखील कोणत्याही संघर्षाशिवाय शरणागती पत्करली. सामान्य नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी संघर्षाचा पवित्रा न घेता शरणागती पत्करली असल्याचा दावा करण्यात आला.

राष्ट्रपती अशरफ गनी यांनी शनिवारी देशाला उद्देशून भाषण केले होते. या भाषणात त्यांनी तालिबानचा प्रतिकार करण्याचे संकेत दिले होते. मागील २० वर्षात अफगाणिस्तानने मिळवलेल्या यशावर पाणी सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे काबुलच्या सीमेवर तालिबानींसोबत संघर्ष निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ही शक्यता फोल ठरली.

Exit mobile version