अमेरिकेतील टेक्सास डेअरी फार्ममधील स्फोटामुळे १८००० हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असून अनेक गाई जखमी झाल्या आहेत. आग एवढी भीषण होती कि सर्वत्र काळ्या ढगांचे साम्राज्य पसरले होते.
आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना खूप मेहनत करावी लागली. या बचावकार्यात एक व्यक्तीही जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यूएसए टुडेच्या माहितीनुसार ही घटना सोमवारी टेक्सास स्थित डीमीट येथे दक्षिण भागातील फोर्क डेअरी फार्मात ही दुर्घटना घडली. आग एवढी मोठं रूप घेईल याची सुरुवातीला कुणालाही कल्पना नव्हती. मात्र दिवस सरत असताना गुरांचे मृतदेह बाहेर येण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांचे डोळे पाणावले.
स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मृत्यू झालेल्या गाईत जास्त करून होल्स्टीन आणि जर्सी गाईंचे प्रमाण अधिक होते. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की फार्ममधील काही उपकरणातील बिघाडामुळे आग लागली असावी. याघटनेचा तपास टेक्सास येथील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. जेव्हा आग लागली तेव्हा गाई दूध काढण्यासाठी बांधण्यात आल्या होत्या त्यामुळे गाईंना पळता आले नाही.
हे ही वाचा:
देशातील १२ हजार सरकारी वेबसाइटवर सायबर हल्ल्याची भीती
अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे बोलावणे
मुंबईत अतिरेकी शिरल्याचा फोन त्याने भावाला त्रास देण्यासाठी केला…
आर्थिक गुन्हेगारांना भारतात कसे पाठवता येईल? मोदी-सुनक झाली चर्चा
या दुर्घटनेत ९० टक्के गाईंचा मृत्यू झाला असून एका गाईची किंमत तब्बल दीड लाख रुपयेहुन अधिक आहे. डिमेटचे महापौर रोजन मेलॉन म्हणाले, आतापर्यंतची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे आग लागली तेव्हा गाईंच्या ओरडण्याचा आवाज आला आणि थोड्या वेळातच आगीने रौद्ररूप धारण करून धुराचे लोट बाहेर पडताना दिसू लागले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुर्घटनेत कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला नसून फार्म मध्ये अडकलेल्या व्यक्तीला कठोर परिश्रमाने वाचवण्यात आले आहे. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.