अबब!! चीनमध्ये ३ कोटी पुरुष अविवाहित…कशामुळे?

अबब!! चीनमध्ये ३ कोटी पुरुष अविवाहित…कशामुळे?

एका सर्वेक्षणानुसार चीनमधील एक अचंबित करणारी गोष्ट आपल्यासमोर आलेली आहे. चीनमधील ३ कोटी पुरूष हे अविवाहित असल्याचे २०२०च्या सर्वेक्षणानंतर समोर आलेले आहे. १११.७ मुलांमागे केवळ १०० मुली इतका जन्मदर चीनमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. या असमानतेमुळे चीनमध्ये हे दृश्य सध्या दिसत आहे. आपल्याला मुलगाच असावा अशी चीनमधील पालकांची इच्छा असल्याचे दिसून येते आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांपासून फक्त एकच मूल या मोहीमेसाठी घरोघरी जागृती करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षण राज्याचा विषय असल्यामुळे मोदी भेटले नाहीत

आदित्य ठाकरे दाखवा आणि फुकट लसीकरण मिळवा

सुशील कुमारला ६ दिवसांची पोलिस कोठडी

टाटा स्टील देणार कोरोनाने मृत कर्मचाऱ्याचा निवृत्तीपर्यंतचा पगार

गतवर्षी चीनमध्ये एकूण १ कोटी २० लाख मुले जन्माला आली होती. प्रत्येकी १११ मुलांमागे फक्त १०० मुली आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजे स्त्रियांची संख्या कमी असल्यामुळे यापैकी ६० हजार मुले अविवाहित राहतील. या अशा असमानतेमुळेच चीनमध्ये आज ३ कोटी पुरुष अविवाहित राहिले आहेत.

चीनची लोकसंख्या ही जगामध्ये सर्वाधिक आहे. तसेच विकसित देशांपैकी एक म्हणून चीनची ख्याती आहे. अशा देशामध्ये हे असे दृश्य म्हणजे चिंतेचीच बाब आहे. या असमानतेवर नियंत्रण आणण्यासाठी चीन सरकार एक मूल मोहीम राबवत आहे. एक मूल या मोहीमेपेक्षा मुलींची संख्या कशी वाढवता येईल याचा विचार प्रामुख्याने करायला हवा. मुलींचा जन्मदर वाढला तरच भविष्यातील प्रश्न सुटू शकेल.

शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृतीही आवश्यक आहे असेही तज्ज्ञांचे मत आहे. ३ कोटी मुले लग्नाविना आहेत ही चिंतेची बाब आहेच. पण या प्रश्नाचे मूळ शोधणे हेच चीन सरकारपुढे खरे आव्हान आहे.

Exit mobile version