कोविड-१९ वरच्या लसीसोबतच अमेरिकेला वेगाने पर्यावरणीय बदलांना आळा घालण्यासाठी करायच्या उपाययोजनांची गरज आहे. ‘आपल्याकडे आता दवडण्यासाठी अधिक वेळ नाही’ असे पत्रकारांसमोर स्वतंत्र पर्यावरणीय टीम जाहीर करताना बायडेन यांनी स्पष्ट केल्याचे समजते.
हे ही वाचा: राष्ट्रांनी पर्यावरण आणीबाणी जाहीर करावी संयुक्त राष्ट्र अध्यक्षांचे आवाहन
बराक ओबामा प्रशासनाने, पॅरिस करारावर सही करून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने विविध योजना आखणे सुरू केले होते. मात्र २०१६ मध्ये अमेरिकेत सत्ताबदल होऊन ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाले. सत्ताग्रहणानंतर त्यांनी आधीच्या सरकारने पर्यावरण रक्षणासाठी आखलेल्या योजना बंद करुन अधिकाधीक खनिज तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनास सुरूवात केली. आता लवकरच अमेरिकेच्या सत्तेची सूत्र स्वीकारणारे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन हे काळाचे चक्र उलट फिरवून अमेरिकेला पुन्हा एकदा पर्यावरण रक्षणाकडे नेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे बायडन यांच्या कारर्किर्दीत अमेरिका पुन्हा एकदा पॅरिस करारात सहभागी होईल असे संकेत मिळत आहेत.