हमासने ओलिस ठेवलेल्या १३ इस्रायली नागरिकांची सुटका केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘आजचा दिवस कठोर मेहनीताच परिणाम आहे. सर्व ओलीस भीषण अत्याचार सहन करून आले आहेत. हमासने नागरिकांना ओलिस ठेवले, त्या पहिल्या दिवसापासूनच मी माझ्या टीमसह २४ तास दिवसरात्र त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होतो,’ अशी प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली आहे.
‘इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचावी आणि ओलिसांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी मी आणि माझी टीम सातत्याने प्रयत्न करत आहोत. आज ओलिसांची झालेली ही सुटका आम्ही युद्धाच्या पहिल्या दिवसापासूनच करत असलेल्या कठोर मेहनतीचा परिणाम आहे,’ असे बायडेन यांनी म्हटले आहे.
‘मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी गेल्या एक महिन्यापासून कतारचे आमिर, इजिप्तचे अल सिसी, इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याशी वारंवार चर्चा केली. आम्ही जॉर्डन, सौदी अरेबिया, यूएई आणि भारतासहित अन्य देशांच्या अध्यक्षांशी चर्चा केली. ओलिसांची सुटका व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले. यात सहभागी झालेल्या देशांचे आभार,’ असे बायडेन यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या
बदनामीची धमकी देत माजी सैनिकाकडून पावणेचार लाख रुपये उकळले
चंद्रशेखर राव म्हणतात, जिंकलो तर मुस्लिम तरुणांसाठी खास आयटी पार्क उभारणार!
‘पंतप्रधान मोदी यांनी धीर दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला’
गाझामध्ये ओलिस असलेल्या आणखी नागरिकांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्या आणखी ओलिसांची सुटका केली जाईल, परवा आणखी ओलिसांना मुक्त केले जाईल, असे जो बायडेन यांनी सांगितले. हमासच्या ताब्यात असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मुक्त केले जाईल. जोपर्यंत प्रत्येक नागरिक आपल्या घरापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी स्वतः कतार आणि इजिप्तसह इस्रायलच्या नेत्यांच्या व्यक्तिगत संपर्कात आहे, असेही बायडेन म्हणाले.