…म्हणून बायडेन यांना सुरक्षित स्थळी हलवले

…म्हणून बायडेन यांना सुरक्षित स्थळी हलवले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या समुद्रकिनाऱ्याजवळील बीच हाऊसवरून एक विमान गेल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हा नो- फ्लायिंग झोन असल्याने जो बायडन यांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. नो- फ्लायिंग झोनमध्ये हे विमान घुसल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

रेहोबोथ बीच परिसरात एक खासगी विमान अचानक नो-फ्लाय झोनमध्ये घुसले. तिथेच जो बायडन यांचं बीच हाऊस असून विमान पाहताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. त्यानंतर त्वरित जो बायडेन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मात्र, बायडेन किंवा त्यांच्या कुटुंबाला कोणताही धोका नसून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण हे सावधगिरीचे पाऊल असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा:

अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरचा खात्मा

‘घोडेबाजार’ शब्दावरून अपक्ष नाराज

हैदराबाद बलात्कार प्रकरणी टीआरएस नेत्याच्या मुलाला अटक

शिक्षकांच्या प्रशिक्षणात गोंधळ; ऑफलाइन प्रशिक्षण घेण्याची मागणी

संबंधित विमान हे चुकून नो-फ्लाय झोनमध्ये घुसले होते. त्यानंतर विमानाला लगेचच बाहेर काढण्यात आले. सध्या विमानाच्या पायलटची चौकशी सुरू आहे. विमान योग्य रेडिओ चॅनेलवर नव्हते आणि उड्डाण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.  सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Exit mobile version