बायडन आणि नेतान्याहू यांची भेट; हमासवर साधला निशाणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायल दौऱ्यावर

बायडन आणि नेतान्याहू यांची भेट; हमासवर साधला निशाणा

इस्रायल आणि हमासमधील युद्धाला अनेक दिवस झाले असून या संघर्षात अमेरिका इस्रायलसोबत ठामपणे उभा आहे. हे युद्ध थांबण्याऐवजी अधिकचं तीव्र होत असल्याचे चित्र आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्रायलला समर्थन देण्यासाठी इस्रायलमध्ये पोहचले आहेत. त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी गाझामधील हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याबाबतही भाष्य केलं.

 

गाझामधील हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यामुळे जगभरातून संताप व्यक्त होत आहे. यानंतर दोन्ही बाजूने हा हल्ला कोणी केला यावरून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. इस्रायलने हा हल्ला आपण केला नसल्याचे म्हटले आहे. हमासच्या दहशतवाद्यांकडूनच हा हल्ला झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जो बायडेन यांनी देखील इस्रायलच्या बाजुने कौल दिला आहे. ते म्हणाले की, असं वाटतंय की हा हल्ला इस्रयइलने नाही तर गाझाच्या दुसऱ्या टीमकडून झाला आहे.

 

जो बायडेन म्हणाले की, “गाझामध्ये झालेल्या हल्ल्यामुळे खूप दु:खी आणि क्रोधित झालो आहे. मी जे काही पाहिलंय त्यावरुळ असं समजतंय की, इस्राइलने नाही तर दुसऱ्या टीमने हा हल्ला केला आहे.” बायडेन यांनी इस्राइयमध्ये येण्याचं कारणही स्पष्ट केलं आहे.

 

बायडन म्हणाले की, “मी येथे यासाठी आलोय की, जगाला कळावं अमेरिका इस्रायलसोबत ठामपणे उभा आहे. हमासने ज्या लोकांची हत्या केलीये त्यातील ३३ अमेरिकी नागरिक होते. हमास पॅलिस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाही. इस्रायलकडे आपल्या सुरक्षेसाठी सर्वकाही असेल याची खात्री अमेरिका करेल.”

हे ही वाचा:

“मी पळालो नाही, पळवण्यात आलं” ललित पाटीलचा आरोप

पाकिस्तानमधील एअर लाईन्स डबघाईला; २४ उड्डाण रद्द

गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?

फरार ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या चेन्नईमधून आवळल्या मुसक्या

तर, नेतान्याहू यावेळी म्हणाले की, “आपण एका वेगळ्या शत्रूसोबत लढत आहोत. हे लोक नागरिकांच्या जिवाची अजिबात काळजी करत नाहीत. ते नागरिकांचा ढाल म्हणून उपयोग करत आहेत. दुसरीकडे आमच्या नागरिकांवर हल्ला करत आहेत. गाझाच्या हॉस्पिटलमध्ये झालेला हल्ला हमासनेच केला आहे. नागरिकांना इजा होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत.”

Exit mobile version