बेल्जियमच्या तरुणीला चालून आले ‘प्रेक्षणीय स्थळ’

अनंतराजू हा रिक्षा चालक असून, तो हंपीमध्ये टुरिस्ट गाईड म्हणूनही काम करतो.

बेल्जियमच्या तरुणीला चालून आले ‘प्रेक्षणीय स्थळ’

कर्नाटकातील अनंतराजू (३०) आणि बेल्जियममधील कॅमिल (२७) यांची कहाणी सध्या चर्चेत आहे. हम्पी येथील विरुपाक्ष मंदिरात शुक्रवार, २५ नोव्हेंबर रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांचे लग्न झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंतराजू कॅमिलच्या प्रेमात पडला होता.

अनंतराजू हा रिक्षा चालक असून, तो हंपीमध्ये टुरिस्ट गाईड म्हणूनही काम करतो. २०१९ मध्ये अनंतराजू पहिल्यांदा कॅमिलला भेटला होता. कॅमिल तिच्या कुटुंबासह हम्पीला भेट देण्यासाठी आली होती. त्यावेळी अनंतराजू याने त्यांना मार्गदर्शन केले होते. सोबतच अनंतराजू याने त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. भारत भेटीदरम्यान अनंतराजू याच्या प्रामाणिकपणाने आणि आदरातिथ्याने कॅमिल आणि तिचे कुटुंब खूप प्रभावित झाले.

पुढे कॅमिल बेल्जियमला परत गेली. सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅमिल आणि अनंतराजू संपर्कात होते. पुढे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले मात्र कोरोनाच्या साथीमुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना नात्याबद्दल सांगितले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या जोडप्याला लग्नाला होकार दिला.अखेर शुक्रवारी या जोडप्याचा विवाह सोहळा संपन्न झाला.

हे ही वाचा :

सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा

‘पोलिस’ निघाले चोर; २२ लाख लुटले

‘आदित्येंच्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत आम्ही काम केलंय’

आसाममध्ये होणार महाराष्ट्र भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

अनंतराजू म्हणाला, आम्ही काही दिवसांतचं एकमेकांच्या प्रेमात पडलो. गेल्या वर्षी लग्न करायचं ठरवलं होतं, पण कोरोनामुळे उशीर झाला. मात्र, आता हिंदू रितीरिवाजांनुसार आमचे लग्न झाले. लग्नासाठी कॅमिलचे जवळपास ४० नातेवाईक आणि मित्र हम्पी येथे आले होते. तो माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप छान क्षण होता. माझ्या लग्नाने हे सिद्ध केले की प्रेमाला सीमा नसते.

Exit mobile version