भारतीय लष्कराने कोविड-१९च्या एक लाख लसी नेपाळी लष्कराला दिल्या आहेत. दोन्ही देशांतील उभयपक्षी सहकार्य वाढवण्याचा प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय लष्कराने हे पाऊल उचलले आहे.
या लसींचा डोस भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांतर्फे नेपाळी लष्कराला त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हस्तांतरित करण्यात आला. या बाबात भारतीय दूतावासाने ट्वीट करून माहिती दिली आहे.
100,000 doses of #MadeInIndia Covid-19 vaccine gifted by Indian Army to the Nepali Army were received at Tribhuwan Airport today.
#VaccineMaitri #IndiaNepalFriendship #NeighbourhoodFirst #COAS
@adgpi @pmoindia @meaindia @thenepalesearmy pic.twitter.com/TtlWWvV4UH— IndiaInNepal (@IndiaInNepal) March 28, 2021
हे ही वाचा:
ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल
मन की बात मधून मोदींनी सांगितलेल्या ‘मीठी क्रांति’चे महत्व
लॉकडाऊनच्या विरोधात भाजपा रस्त्यावर उतरेल
भारताने यापूर्वी देखील नेपाळला ‘मेड इन इंडिया’ लसी दिलेल्या होत्या. त्यामुळे नेपाळच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरूवात होऊ शकली होती.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार सिरम इन्स्टिट्युटकडून लसी खरेदी करायला उशीर झाल्याने नेपाळने त्यांचा संपूर्ण लसीकरणाचा कार्यक्रमच रद्द केला आहे.
काही काळापूर्वी चीनच्या नादाला लागून नेपाळच्या तत्कालिन पंतप्रधानांनी भारताशी फारकत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याबरोबरच आपल्या नकाशात बदल करून भारताची काही गावे देखील स्वतःच्या हद्दीत दाखवण्याचा खोडसाळपणा देखील केला होता. मात्र तरीही नेपाळला भारताने यापूर्वी देखील लसींचा पुरवठा केला होता.
मात्र भारतीय लष्कराने शेजारधर्म जपत पाठवलेल्या लसींचे कौतूक केले जात आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत, त्याबरोबरच मोदी सरकारचे देखील आभार मानले आहे.
भारतीय लष्कराने नेपाळ आर्मीला १ लाख कोरोना लसीचे डोस दिले भेट… कारण नेपाळ आमचे शेजारी राष्ट्र आहे… धन्यवाद भारतीय लष्कर, धन्यवाद मोदी सरकार 🙏🙏🌷🌷🇮🇳🇮🇳🇳🇵🇳🇵 pic.twitter.com/SvJKhfyjda
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 30, 2021