मेहबुबांची मुफ्तीफळे; म्हणे आर्यन मुस्लिम असल्याने होतेय कारवाई

मेहबुबांची मुफ्तीफळे; म्हणे आर्यन मुस्लिम असल्याने होतेय कारवाई

अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाच्या म्हणजेच आर्यनच्या प्रकरणात मेहबूबा मुफ्ती यांनी उडी घेत त्याच्याविरुद्ध झालेली कारवाई ही तो मुस्लीम असल्यामुळे झाल्याचा कांगावा करायला आता सुरुवात केली आहे. पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी आर्यन खानची बाजू घेतली आहे.

एवढेच नव्हे तर मेहबूबा मुफ्ती या काश्मीरहून थेट उत्तरप्रदेशातील घटनांवरही बोलू लागल्या आहेत. लखीमपूर हिंसेवरून केंद्र सरकार लखीमपूर खीरी हिंसेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी काश्मीरमध्ये हिंदुंच्या होत असलेल्या हत्येबद्दल मात्र त्यांनी मूग गिळून गप्प राहणेच पसंत केले आहे. आर्यन खानची बाजू घेताना त्या म्हणाल्या आहेत की, एका २३ वर्षीय मुलाला सरकारी एजन्सी टार्गेट करत आहेत.

यावर भाजप खासदार अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून मुफ्ती यांच्या विधानाचा समाचार घेताना म्हटले आहे की, आधी तुम्ही पोसलेले काश्मीरातले दहशतवादी हे लोकांना हिंदू असल्यामुळे गोळ्या घालून ठार करताय त्यावरही कधीतरी थोबाड उघड गं बाई..

 

हे ही वाचा:

अमिताभ बच्चन यांनी पान मसाल्याची जाहिरात का नाकारली?

‘लाख’मोलाची खोखोपटू

ठाकरे सरकार विरोधात शेतकऱ्यांचा अन्नत्याग

‘आज वसुली सुरू आहे की बंद?’

 

मेहबुबांच्या या वक्तव्यामुळे त्या सोशल मीडीयावर चांगल्याच ट्रोलही झाल्या आहेत. मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे की, त्याचे आडनाव खान आहे म्हणून त्याला त्रास दिला जातोय. सध्याच्या घडीला आर्यन खानचा जामीन अर्ज कोर्टाने पुन्हा फेटाळला आहे. त्यामुळे आर्यनचा मुक्काम आणखी दोन दिवस म्हणजेच बुधवार १३ ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील आर्थर रोड जेलमध्येच असणार आहे. मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.

Exit mobile version