होशियार! लॉकडाऊन पुन्हा येत आहे

होशियार! लॉकडाऊन पुन्हा येत आहे

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारसमोर नवी चिंता उत्पन्न झाली आहे. त्यातच विदर्भात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने पुन्हा एकदा राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केला जाणार का अशी चिंता सामान्य नागरिकांमध्ये पसरली आहे.

हे ही वाचा:

पुण्यात २८ फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू

अमरावती, अकोला या भागात विकेंड लॉकडाऊन करण्यात आला होता. शनिवार, रविवारी करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमध्ये अमरावतीत शुकशुकाट होता.

आजपासून ७ दिवस अमरावती, अचलपूरमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी याबद्दल सांगितले आहे. या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. लॉकडाऊन उद्या संध्याकाळपासून लागू होणार आहे.

अमरावतीमध्ये झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागल्याने प्रशासनासमोर चिंता निर्माण झाली होती. शहरात एकूण १२ क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली होती.

पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील १५ शहरांना देखील रेड अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

मागील काही काळ राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत होती. मात्र आता पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने राज्यात चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version