युकेची (युनायटेड किंगडम) सरकारी मालकीची वृत्तवाहिनी बीबीसीला चीनमध्ये प्रक्षेपण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासाठी चीनी सरकारने, बीबीसीने सरकारी निर्देशांचे उल्लंघन करून देशहिताला घातक मजकूराचे प्रसारण केल्याचे कारण पुढे केले आहे. याबद्दल युकेकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. युकेचे परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब यांनी सांगितले की अशा प्रकारे माध्यमांवर आणली जाणारी बंदी अस्वीकारार्ह्य आहे.
हे ही वाचा:
युकेकडू ही प्रतिक्रीया चीनने बीबीसी वर्ल्ड न्युजचे प्रक्षेपण थांबवणार असल्याचे सांगितल्यावर देण्यात आली. चीनच्या नॅशनल रेडियो ऍण्ड टेलिव्हिजन ऍडमिनिस्ट्रेशनने (एनआरटीए) दिलेल्या माहितीनुसार बीबीसी वारंवार चीनी निर्बंधांचे उल्लंघन करून वार्तांक निष्पक्ष आणि सत्य असावे या तत्त्वाच्या विरोधात जाऊन चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक झाल्याने त्यांच्यावर बंदी लादण्यात आली आहे. त्यामुळे बीबीसी वर्ल्ड न्युजचा पुढील वर्षी प्रक्षेण करू देण्याचा अर्ज एनआरटीए स्वीकारणार नसल्याचे कळले आहे.
यादरम्यान युकेनेदेखील हुआवेई सारख्या चीनी टेलिकॉम कंपन्यांना देखील ५जी मधील गुंतवणुकी पासून दूर ठेवले आहे. युकेने हे पाऊल अमेरिकेने चीनी कंपन्या गुप्तहेरगीरी करू शकत असल्याची भीती व्यक्त केल्यानंतर उचलले होते.
बीबीसीने नुकतीच कोविड-१९ या आजाराबाबत परखड भाष्य करणारी डॉक्युमेंट्री केली होती. त्यात चीनने या आजाराची बातमी लपविण्यासाठी केलेल्या कृष्णकृत्यांची माहिती दिली होती. वुहानमधील परिस्थिती देखील चीनने कशा तर्हेने दडवली हे देखील बीबीसीने दाखवले होते. त्याबरोबरच चीनमधील उईघुर मुस्लिम स्त्रीयांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना देखील बीबीसीने वाचा फोडली होती.