पश्चिम आशियातील देश असलेल्या सीरियातील परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून बिकट होती. सीरिया सरकारच्या विरोधात बंडखोर सातत्याने वेगवेगळ्या भागांवर हल्ले करून विविध भागांवर ताबा घेत होते. यानंतर आता सीरियामध्ये अध्यक्ष बशर अल- असाद यांची २४ वर्षांची राजवट बंडखोरांनी उलथवून टाकली आहे.
हयात तहरीर अल- शाम (HTAS) या बंडखोर संघटनेचा नेता अबू मोहम्मद अल- जोलानी याने राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्याचा दावा केला असून देशातील सरकारी रेडिओ केंद्र आणि टीव्ही चॅनेल्स बंडखोरांनी ताब्यात घेतले आहेत. सत्ता गमावलेले बशर अल- असद आपल्या कुटुंबासह मॉस्कोला पोहचल्याची माहिती आहे.
रशियाने बशर अल- असद यांच्यासह कुटुंबियांना आश्रय दिला आहे. रशियाच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली आहे. रशियाने त्यांना मानवतावादी आधारावर आश्रय दिला आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी बंडखोरांनी दमास्कसमधील असद यांच्या राजवाड्यावर ताबा मिळवला.
सीरियातील बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल- असद यांच्या राजवाड्यांवर कब्जा केल्यानंतर लोकांनी फर्निचर आणि महागड्या वस्तू पळवल्या. तर अनेकांनी फोटोही काढले. असद यांचे सरकार बंडखोरांनी उलथवून लावल्यानंतर लोक आनंद साजरा करत असल्याचं दिसून येत असून सीरियातल्या संघर्षामुळे आतापर्यंत साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोक स्थलांतरित झाले आहेत.
हे ही वाचा :
लोकशाहीवरून विश्वास उठेल, अशा प्रकारची कारवाई किमान पवारांनी करू नये!
बांगलादेशांतील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात मीरा भाईंदर, घाटकोपर, ठाण्यात मोर्चे!
मोहम्मद युनूस नोबेल पारितोषिकासाठी पात्र नाहीत, पुरस्कार काढून घ्या!
लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्याची दांडी का उडविली?
तहरीर अल- शाम संघटनेचा म्होरक्या अबू मोहम्मद अल-जोलानी याने बशर अल असाद यांच्याविरुद्ध बंड करत गृहयुद्धच पुकारलं होतं. पूर्वी अबू मोहम्मद अल- जोलानी अल- कायदामध्ये कार्यरत होता. पण २०१६ मध्ये त्याने अल-कायदाशी संबंध तोडले आणि स्वतःची संघटना स्थापन केली.