24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियाझेलेन्स्कीना मिळाली ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांच्या आईकडून गोड भेट...

झेलेन्स्कीना मिळाली ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांच्या आईकडून गोड भेट…

मिठाईचा आस्वाद घेतानाचा व्हीडिओ झाला व्हायरल

Google News Follow

Related

इंस्टाग्रामवर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ऋषी सुनक हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना त्यांच्या आईने बनवलेली भारतीय बर्फी खायला देताना दिसत आहेत.

 

सुनक यांनी यासंदर्भातील एक व्हीडिओ इन्स्टावर शेअर करत या घटनेची आठवण करून दिली. ते त्या व्हीडिओत म्हणतात, “माझ्या आईचे फार्मसीचे दुकान आहे. आईकडे भारतीय पद्धतीची मिठाई होती. त्यात बर्फी होती. आईने ती बनवली होती. तिला ती मला द्यायची होती. त्यानंतर सोमवारी मी अध्यक्ष झेलेन्स्की यांना भेटलो. ते आणि मी गप्पा मारत होतो. त्यांना भूक लागली होती. म्हणून मी त्याला माझ्या आईने केलेली बर्फी दिली. ते दृश्य पाहून माझ्या आईला खूप आनंद झाला.”

 

या संपूर्ण देवाणघेवाणीचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ ऋषी सुनक यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्याला शीर्षक देताना सुनक म्हणतात, “@zelenskiy_official ने आईने पाठवलेली मिठाई खावी, हा योग नेहमी येत नाही.”

 

व्हिडिओला इंस्टाग्राम युजर्स कडून बऱ्याच सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. एकाने असे लिहिले की, “हे दृश्य खूप सुंदर आहे… आपण सर्वजण आपापल्या आईच्या बर्फीशी याचा संबंधित सहज जोडू शकतो.” दुसर्‍याने आठवण करून दिली, “ऋषी, यामुळे आमच्याही अनेक आठवणींना उजाळा मिळाला तुमच्या आईने फार्मसीमध्ये भारतीय मिठाई आणली तेव्हा मला ते खूप आवडले होते; ती खूप स्वादिष्ट होती.” तिसऱ्या वापरकर्त्याने मानवतेचे महत्त्व अधोरेखित करत लिहिले, “शेअर करणे आणि काळजी घेणे… पंतप्रधान होण्यापेक्षा एक उत्तम माणूस असणे अधिक महत्त्वाचे आहे.”

झेलेन्स्की यांचा दुसरा ब्रिटन दौरा

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अलीकडेच त्यांच्या युरोपीय दौऱ्याचा एक भाग म्हणून ब्रिटनला भेट दिली, रशियाविरुद्ध प्रतिआक्रमणासाठी नवीन शस्त्रे मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर हा त्यांचा ब्रिटनचा दुसरा दौरा ठरला. त्यांच्या भेटीदरम्यान, झेलेन्स्की यांनी यूकेकडून मिळालेल्या समर्थनाच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, “आम्ही हृदयापासून युक्रेनियन लोकांच्या वतीने, आमच्या सैनिकांचे आभारी आहोत. आम्ही खरंच कृतज्ञ आहोत. आणि हे येथे येणे याला एक विशेष महत्व आहे.”

हे ही वाचा:

‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपा अव्वल, तर फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पसंती

सिक्कीममध्ये पावसाचा तांडव, ३०० पर्यटकांना बाहेर काढण्यात यश

मराठी भाषेवरून गुंदेचा हायस्कूलला मनसेचा दणका !

अमेरिकेच्या व्हॉट्सऍप निर्बंधांमुळे तालिबानी सरकार चालवणे बनले मुश्किल!

 

 

प्रत्युत्तरादाखल, पंतप्रधान सुनक यांनी घोषणा केली की ब्रिटन युक्रेनला शेकडो हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे आणि अतिरिक्त मानवरहित हवाई प्रणाली प्रदान करेल, ज्यात २०० किमी पेक्षा लांब पल्ल्याच्या नवीन अटॅक ड्रोनचा समावेश आहे, जे येत्या काही महिन्यांत युक्रेनला हस्तांतरित केले जातील.

 

सुनक यांनी युक्रेनला आंतरराष्ट्रीय पाठिंब्याचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “युक्रेनने न भडकावलेल्या या भयंकर आक्रमकतेच्या प्रतिकारातील हा युक्रेनसाठी एक निर्णायक क्षण आहे. एक वर्षाहून अधिक काळ युक्रेनवर चाललेले दैनंदिन अंदाधुंद हल्ले हे एक भीषण वास्तव राहिले आहे. या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अविरत समर्थनाची नितांत आवश्यकता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा