४०० वर्षांनंतर बार्बाडोस झाला प्रजासत्ताक! ‘ही’ प्रसिद्ध गायिका आहे देशाची राष्ट्रनायक

४०० वर्षांनंतर बार्बाडोस झाला प्रजासत्ताक! ‘ही’ प्रसिद्ध गायिका आहे देशाची राष्ट्रनायक

बार्बाडोस हा देश आता प्रजासत्ताक झाला आहे. तब्बल चारशे वर्ष ब्रिटिशांच्या छत्रछायेखाली असलेल्या बार्बाडोस देशाने आता स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले आहे. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांना राष्ट्राध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यामुळे बार्बाडोस हाता एक प्रजासत्ताक देश म्हणून जगाच्या पटलावर उदयास आला आहे.

सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बार्बाडोस एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश तयार झाला आहे. देशाला तब्बल चारशे वर्षानंतर त्यांचा पहिला राष्ट्रपती मिळाला आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या ब्रिजटाऊन येथील प्रसिद्ध अशा चेंबरलीन ब्रिजवर शेकडो नागरिकांनी एकत्र जमत हा दिवस साजरा केला. आपल्या प्रजासत्ताकाचा उत्सव साजरा करताना सर्वच नागरिकांमध्ये उत्साह पहायला मिळाला. या खास दिवशी नागरिकांनी आनंदाने घोषणाही दिल्या आहेत.

हे ही वाचा:

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

महापौरांच्या दालनातूनच फाईल्स गायब! मुंबई महापालिकेतील वाझे कोण?

शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला; मुंबईत शाळा १५ डिसेंबरपासून

चारपैकी मुख्यमंत्री परिवारातील दोन नेते घोटाळेबाजांमध्ये

हिरो स्क्वेअर या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. या वेळी बार्बाडोसचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. या राष्ट्रगीताच्या सन्मानात सर्व नागरिक अभिमानाने उभे होते. त्यांचे उर आनंदाने भरून आले होते. तर ते भावूकही झालेले दिसले. राष्ट्रगीत झाल्यानंतर २१ तोफांची सलामी देण्यात आली. बघता बघता ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा ध्वज उतरवण्यात आला. तर त्याचवेळी बार्बाडोसचा राष्ट्रध्वज मात्र दिमाखात फडकत होता. या समारंभाला ब्रिटनच्या महाराणीचे सुपूत्र राजकुमार चार्ल्स हे उपस्थित होते.

महाराणी एलिझाबेथ यांना राष्ट्राध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर सॅन्ड्रा मेसन यांना प्रजासत्ताक बार्बाडोसच्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर प्रसिद्ध गायिका रिहाना हिला राष्ट्रनायक घोषित करण्यात आला आहे. रिहाना ही मुळची बार्बाडोसची नागरिक आहे.

Exit mobile version