अब्जाधीश बँकर ‘बाओ फॅन’ चीनमधून बेपत्ता,

शेअर्स पण ५० टक्क्यांनी घसरले

अब्जाधीश बँकर ‘बाओ फॅन’ चीनमधून बेपत्ता,

चीनमधील हाय प्रोफाईल अब्जाधीश बँकर ‘बाओ फॅन’ बेपत्ता झाले आहेत . सध्या त्यांचा कुठलाच संपर्क होत नसल्याचे समोर येत आहे. याआधी २०२० साली चीनमधील अलिबाबाचे  मालक जॅक मा बेपत्ता झाले होते. त्यानंतर तीन महिन्यांनी ते सर्वांसमोर आले होते. बाओ फॅन यांची कंपनी चायना रेनेसॉन्स होल्डींग्सने हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज  अर्थात चिनी शेअर बाजार यांनी  माहिती दिली आहे की, बाओ फॅन सध्या कुठे आहेत याबाबत कुठलीच माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याबरोबर संपर्क पण होत नसून याबाबत चीनमध्ये आर्थिक क्षेत्रांत मोठी खळबळ माजली आहे.

बाओ फॅन याच्या चायना रेनेसॉन्स होल्डींग्स या कंपनीने माहिती दिली आहे की, त्यांच्याशी आमचा कुठलाच संपर्क होऊ शकत नाही , असे गुरुवारी कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या मार्केट अपडेट्स मध्ये जाहीर केले आहे, चीनमध्ये आघाडीचे डील ब्रोकर म्हणून ज्यांची ओळख असलेले , दीदी आणि मिटुआन सारख्या टेक दिग्गज ग्राहकांचा समावेश आहे. बाओ बेपत्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचे परिणाम दिसत असून त्यांच्या कंपनीचे शेअर्स ५० टक्क्यांनी घसरल्याचे दिसत आहेत. कोरोनामुळे गेल्या तीन वर्षात चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून आला आहे. हळूहळू गाडी आता पूर्वपदावर येत आहे पण आता  अब्जाधीश बँकर फॅन  हे  बेपत्ता झाल्यामुळे चीनच्या बँकिंग तसेच एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. फॅन हे चीनमधील सर्वात मोठ्या बॅंकर्सपैकी एक असून ते बेपत्ता होणे असामान्य बाब आहे. त्यांच्या कंपनीबरोबरच देशाच्या बँकिंगवर पण  याचा परिणाम दिसून येत आहे.

हे ही वाचा:

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

शिवसेना, चिन्ह शिंदेंकडे गेल्यावर राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेबांचा तो व्हीडिओ

अब्जोपती सोरोसने भारताच्या लोकशाहीवर ओकली गरळ;  भारतीयांनी केले लक्ष्य

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शनिवारी घेणार शपथ

बाओ फॅन कोण आहेत ?
बाओ फॅन हे चीनमधील अब्जाधीश बँकर आहेत. चीनच्या फिंटेक मार्केटमध्ये एक मोठे नाव आहे. २०१८ साली चायना रेनेसॉन्स हॉंगकॉंग स्टॉक  एक्सचेंजच्या यादीत आले आणि २०२१ मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग सुद्धा झाली होती. बाओ फॅन  यांनी हि कंपनी सुमारे १८ वर्षांपूर्वी सुरु केली. त्यांच्याकडे ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स आहेत. त्याच्या ब्रोकिंग मध्ये दीदी, काही अन्न वितरण  कंपन्या , कुएदी आणि इतर काही मोठ्या कंपन्या आहेत. चीनच्या मोठ्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ मोठ्या करारांमध्ये त्यांचा वाटा महत्वपूर्ण आहे.

दरम्यान २०२० साली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आणि अलीबाबा ग्रुपचे मालक असलेले जॅक मा हे सुद्धा बेपत्ता झाल्याची बातमी होती. ते तीन महिने बेपत्ता होते. चीनच्या सरकारी बँकांवर आणि आर्थिक नियमांवर त्यांनी टीका केली होती त्यानंतरच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर सुद्धा त्यांचा वाद झाला होता त्यानंतरच ते बेपत्ता होते. तीन महिन्यांनंतर ते सर्वांसमोर सुखरूप आल्यावर त्यांच्या कंपनीचे शेअर्स पुन्हा वधारले होते.

Exit mobile version