चीनमध्ये राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाल्याची शक्यता आहे. शी जिनपिंग पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडून येणार असल्याची दाट शक्यता असताना त्यांना विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे.
चीनमध्ये दर पाच वर्षांनी एकदा होणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसची तयारी सुरू आहे. यावेळी तिसऱ्यांदा शी जिनपिंग पुन्हा एकदा निवडून येणार हे जवळपास निश्चित असताना चीनची राजधानी बीजिंगमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनावर (CPC) टीका करणारे बॅनर लावण्यात आल्याची माहिती आहे.
या बॅनरवर शून्य- कोविड धोरण संपुष्टात आणण्याची, CPC नेत्याची उचलबांगडी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आम्हाला कोविड चाचणी नको, अन्न हवे. आम्हाला लॉकडाऊन नको, स्वातंत्र्य हवे आहे. प्रतिष्ठा हवी आहे, खोटेपणा नको. नागरिक म्हणून राहायचे आहे गुलाम म्हणून नको. अशा आशयाचे बॅनर चीनमध्ये झळकले होते. संबंधित बॅनरचे फोटो व्हायरल होताच पोलिसांनी ते काढून टाकल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले
मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा
CPC परिषद १६ ऑक्टोबरपासून चीनमध्ये होणार आहे. यासाठी पोलिस यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. चीनमध्ये राजकीय विरोध करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे जे बॅनर लावण्यात आले आहेत ते रात्री लावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, ते कोणी लावले याची माहिती समोर आलेली नाही.