चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

चीनमध्ये मोठे बँकिंग संकट उभे राहिले आहे. या संकटामुळे अनेक चिनी बँकांनी ग्राहकांवर पैसे काढण्यासाठी निर्बंध लावले आहेत. त्यामुळे हजारो नागरिक रस्त्यांवर निदर्शनं करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. त्यामुळे आता बँकांच्या आजूबाजूला रणगाडे तैनात करण्यात आले आहेत.

एप्रिलमध्ये दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टमध्ये चिनी बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्या संबंधित माहिती देण्यात आली होती. त्यात ४० अब्ज युआन म्हणजेच ६ अब्ज डॉलर्स चीनच्या बँकिंग व्यवस्थेतून गायब झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर हेनान आणि अनहुई प्रांतातील बँकांनी ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यावर पूर्णपणे निर्बंध घातले आहेत. त्यासाठी सिस्टिम अपग्रेडचे कारण देण्यात आले होते.

यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ हेनान प्रांतातील असून या ठिकाणी अनेक रणगाडे एका रांगेत उभे असल्याचे या व्हिडीओत दिसते आहे. लोकांनी बँकांमध्ये घुसू नये यासाठी प्रशासनाने रणगाडे तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

या संपूर्ण प्रकरणात न्यू ओरिएंटल कँपिंग बँक ऑफ कैफेंग, शांगकाई हुईमिन काउंटी बँक, जिचेंग हुआंगहुई कम्युनिटी बँक आणि युजौ शिन मिन विलेज बँक या चार बँकांवर जास्त परिणाम झाला आहे. या ठिकाणी ग्राहक गेल्या तीन महिन्यांपासून बँकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना आत प्रवेश दिला जात नाहीये.

Exit mobile version