नापाक इरादे… भारत- बांगलादेश सीमेवर आण्विक क्षेपणास्त्रे तैनात करण्याविषयी चर्चा

बांगलादेशी प्राध्यापकाकडून भारताविरोधात गरळ ओकाण्याचे काम

नापाक इरादे… भारत- बांगलादेश सीमेवर आण्विक क्षेपणास्त्रे तैनात करण्याविषयी चर्चा

बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथील प्रसिद्ध अशा ढाका विद्यापीठात लोकांना संबोधित करताना एका प्राध्यापकाने केलेल्या विधानानंतर खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या मदतीने भारत- बांगलादेश सीमा भागात आण्विक क्षेपणास्त्रे तैनात करण्याबाबतचे विधान प्राध्यापक शाहीदुझ्झमन याने केले आहे.

बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन पेटले होते. या आंदोलनाला पुढे हिंसक वळण मिळाले आणि अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून खाली उतरावे लागले. यानंतर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले असून या सरकारच्या काळात बांगलादेशचा कल पाकिस्तानकडे वाढला असल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे अल्पसंख्याक हिंदू समाजावर बांगलादेशमध्ये सातत्याने हल्ले होत आहेत.

बांगलादेशच्या ढाका विद्यापीठात भारताविरुद्ध विष ओकताना प्राध्यापक शाहीदुझ्झमन याने बांगलादेशमध्ये आण्विक क्षेपणास्त्रांच्या तैनातीबद्दल भाष्य केले आहे. “भारताची सवय बदलण्यासाठी, बांगलादेशला अण्वस्त्र सक्षम बनवणे हेच योग्य उत्तर असेल. अणु-सक्षम असण्याचा अर्थ असा नाही की आपण अणुशक्ती बनले पाहिजे. मला असे म्हणायचे आहे की आपण पाकिस्तानशी अणु करार केला पाहिजे,” असं वक्तव्य प्राध्यापक शाहीदुझ्झमन याने केलं आहे.

हे ही वाचा : 

हैद्राबादमधील सिकंदराबादमध्ये बाप्पाच्या वेशभूषेवरून वाद

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न? हल्लेखोर अटकेत

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या पत्रकाराची सॅम पित्रोदांनी मागितली माफी

बजाज हाऊसिंग फायनान्सची दमदार एन्ट्री; ११४ टक्क्यांनी वाढला शेअरचा भाव

पुढे प्राध्यापक म्हणाला की, “पाकिस्तान नेहमीच बांगलादेशचा सर्वात विश्वासू सुरक्षा भागीदार राहिला आहे. पण आपण यावर विश्वास ठेवावा असे भारतीयांना वाटत नाही. आपण यावर विश्वास ठेवू नये अशी अवामी लीगची इच्छा आहे. पण बांगलादेशने पाकिस्तानकडे झुकले पाहिजे, हे खरे आहे. आपण भारतासोबत राहावे असे पाकिस्तानला वाटत नाही. भारतापासून आमचे संरक्षण करण्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत.” भारताला बांगलादेशचा काही भाग ताब्यात घेऊन ईशान्येकडील राज्यांचा भाग बनवायचा आहे आणि हे थांबवण्यासाठी पाकिस्तानशी करार करून अण्वस्त्र क्षेपणास्त्रे घेणे आवश्यक आहे, असा दावाही प्राध्यापक शाहीदुझमान याने केला आहे.

Exit mobile version