चिन्मय कृष्णा दास यांच्या बाजूने लढणाऱ्या बांगलादेशी वकिलावर बांगलादेशात हल्ला

इस्कॉन इंडियाचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी दिली माहिती

चिन्मय कृष्णा दास यांच्या बाजूने लढणाऱ्या बांगलादेशी वकिलावर बांगलादेशात हल्ला

भारतातील इस्कॉनकडून असा दावा करण्यात येत आहे की, बांगलादेशमध्ये अटक करण्यात आलेले भिक्षु चिन्मय कृष्णा दास यांच्या बाजूने न्यायालयीन लढाई लढणाऱ्या बांगलादेशी वकिलांवर कट्टरवाद्यांनी क्रूरपणे घरात हल्ला केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले वकील सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहेत. ते मृत्यूशी झुंज देत आहेत. देशद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय दास यांच्या अटकेच्या दरम्यान बांगलादेशमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.

सोमवारी एका ट्विटमध्ये, इस्कॉन इंडियाचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास म्हणाले की, “कृपया वकील रामेन रॉय यांच्यासाठी प्रार्थना करा. चिन्मय कृष्ण प्रभू यांचा न्यायालयात बचाव करणे हा त्यांचा एकमेव दोष होता. इस्लामवाद्यांनी त्यांच्या घराची तोडफोड केली आणि त्यांच्यावर क्रूर हल्ला केला. सध्या ते आयसीयूमध्ये असून त्यांच्या मृत्यूशी झुंज देत आहेत.” राधारमण दास यांनी एका स्थानिक बंगाली वृत्तवाहिनीला असेही सांगितले की, रॉय यांच्यावरील हल्ला हा चिन्मय दास यांचा न्यायालयात बचाव करण्याचा थेट परिणाम होता, अशी बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. ही घटना बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्यांना भेडसावत असलेल्या वाढत्या धोक्याचे प्रतिबिंबित करते, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

मालेगाव व्होट जिहाद घोटाळा: नामको बँकेच्या व्यवस्थापकासह सहव्यवस्थापकाला अटक

एकनाथ शिंदेंशी कोणतेही मतमतांतर नाही…आमचा शपथविधी दिमाखदार होईल

अजित पवार महायुतीत नसते तर?

मेट्रिमोनियल वेबसाईटवर राहुल नाव सांगून मोहम्मद हुसैनने तरुणीवर केले लैंगिक अत्याचार

ढाका विमानतळावरून २५ नोव्हेंबरला अटक करण्यात आलेल्या चिन्मय दासवर ऑक्टोबरमध्ये एका रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेनंतर ढाका आणि चितगावमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. त्यांच्यावरही कट्टरवाद्यांनी हल्ला केला. चितगाव येथील न्यायालयाबाहेर झालेल्या निदर्शनेदरम्यान एका मुस्लीम वकिलाचा मृत्यू झाला. हिंसाचाराच्या संदर्भात पोलिसांनी ३३ जणांना अटक केली आहे.

Exit mobile version