31 C
Mumbai
Wednesday, April 9, 2025
घरदेश दुनियाजयशंकर यांनी बांगलादेशचे कान पिळले!

जयशंकर यांनी बांगलादेशचे कान पिळले!

बिमस्टेक परिषदेत भाषण करताना दिले सडेतोड उत्तर

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सध्या बिमस्टेक परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी थायलंडमध्ये आहेत. या परिषदेमध्ये भाषण करताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना खडेबोल सुनावले आहेत. काही दिवसांपूर्वी युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडी राज्यांना भूपरिवेष्ठित म्हणत या प्रदेशाच्या समुद्राचा बांगलादेशला एकमेव संरक्षक म्हणून समोर आणले होते. यावरून खळबळ उडालेली असताना आता एस जयशंकर यांनी युनूस यांना चांगलेच सुनावले आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, भारताला बंगालच्या उपसागरातील बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य उपक्रम (BIMSTEC) मध्ये असलेली आपली जबाबदारी समजते. शिवाय आम्हाला आर्थिक आणि भू-राजकीय घडामोडींची जाणीव आहे. भारताचा असा विश्वास आहे की प्रादेशिक सहकार्य हा एकात्मिक दृष्टिकोन आहे आणि तो निवडक विषयांवर आधारित नाही.

थायलंडमधील सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेला संबोधित करताना जयशंकर म्हणाले की, “बंगालच्या उपसागरातील आणि आजूबाजूच्या देशांचे हितसंबंध आणि चिंता सामायिक आहेत. भारताला त्याच्या मर्यादा, प्राधान्यक्रम आणि जबाबदाऱ्या माहित आहेत. बंगालच्या उपसागरात भारताला सर्वात जास्त ६,५०० किमी लांबीचा किनारा लाभला आहे. भारताची या प्रदेशातील पाच बिमस्टेक सदस्य देशांशी सीमा आहे. भारताची सीमा केवळ पाच बिमस्टेक सदस्य देशांशीच नाही तर तो या प्रदेशातील एक प्रमुख कनेक्टिव्हिटी हब म्हणून आपली उपस्थिती देखील मजबूत करत आहे. ईशान्य प्रदेश विशेषतः बिमस्टेकसाठी कनेक्टिव्हिटी हब बनत आहे. याअंतर्गत, रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि पाइपलाइनचे विस्तृत जाळे विकसित केले जात आहे. शिवाय, त्रिपक्षीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे भारताचा ईशान्य भाग प्रशांत महासागराशी जोडला जाईल, जो खरोखरच एक गेम चेंजर असेल,” असे एस जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हे चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चीनला त्यांच्या प्रदेशात म्हणजेच देशात विस्तार करण्याचे आमंत्रण दिले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी भारताच्या ईशान्येकडील सात राज्ये म्हणजेच seven sisters बद्दलही भाष्य करत या प्रदेशात बांगलादेश हा महासागराचा एकमेव रक्षक असल्याचा दावाही केला. यानंतर मोहम्मद युनूस यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतातून आता तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

हे ही वाचा : 

फटकेबाजी, चौकार-षटकारांचा पाऊस आणि ऑरेंज कॅपची शर्यत!

विराटच्या बोटाला लागलंय; पण आरसीबीच्या नशिबाला?

पीपीएफ खात्यात वारस अपडेटसाठी आता पैसे द्यावे लागणार नाहीत

भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राची भरारी

युनूस म्हणाले होते की, “भारताची पूर्वेकडील सात राज्ये म्हणजेच ज्याला सात बहिणी (seven sisters) म्हणतात, ते जमिनीने वेढलेले आहेत. त्यांच्याकडे समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. या प्रदेशात आपणच महासागराचे एकमेव रक्षक आहोत. यामुळे मोठ्या शक्यता निर्माण होतात. येथे चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार असू शकतो.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा