28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामासत्ताधारी अवामी लीगचा खासदार मशर्फे मूर्तझाचे घर जाळले; नेते शाहीन चकलादार यांचे...

सत्ताधारी अवामी लीगचा खासदार मशर्फे मूर्तझाचे घर जाळले; नेते शाहीन चकलादार यांचे हॉटेल पेटवले

हसीना यांच्या अवामी लीग सदस्यांची घरे, व्यवसाय यावर आता हल्ले

Google News Follow

Related

बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू आलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन सोमवारी त्यांनी देशही सोडला. हिंसाचाराचे लोण आता देशभरात पसरत असून हसीना शेख यांच्या पक्षाच्या नेत्यांना आता आंदोलकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे.

बांगलादेशचे माजी क्रिकेटपटू मशर्फे मुर्तझा हे हसीना शेख यांचा पक्ष अवामी लीगचे खासदार म्हणून निवडून आले होते. देशात सुरू असलेल्या या निदर्शनांदरम्यान मशर्फे मुर्तझा यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. मशर्फे मुर्तझा यांच्या घराला आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे. घराला आग लावण्याआधी घराची तोडफोड करण्यात आली असून लूटमार झाल्याचेही वृत्त आहे.

मशर्फे मुर्तझा हे बांगलादेशातील नराइल-२ मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांना माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाते. बांगलादेशमधील कथित नरसंहार आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक अटकेविरोधात मुर्तझा यांनी मौन बाळगलं होतं म्हणून आंदोलकांनी संताप व्यक्त केला असल्याचे बोलले जात आहे. मुर्तझा यांच्या घराला आग लावण्याबरोबरच हिंसक आंदोलकांनी जिल्ह्यात असलेल्या अवामी लीगच्या कार्यालयालाही आग लावली. दुसरीकडे शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्या अधिकृत निवासस्थानाची लूट आणि तोडफोड करण्यात आली.

हे ही वाचा:

“शेख हसीना कदाचित बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत”

बांगलादेशातील हिंसाचारामुळे आयसीसी चिंतेत; महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे ठिकाण बदलणार?

मूकबधिर तरुणांनीच केली मूकबधिर तरुणाची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये

भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कमाल, रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश !

मशर्फे मुर्तझा हे बांगलादेशकडून २० वर्षे क्रिकेट खेळले आणि बराच काळ त्यांच्याकडे कर्णधारपदही होते. आपल्या कारकिर्दीत ते ३६ कसोटी सामने खेळले. त्यांच्या नावे ७८ विकेट आणि ७९७ धावा आहेत. तर, त्यांच्या नावावर २२० एकदिवसीय सामन्यांमध्ये २७० विकेट्स आणि १,७८७ धावा आहेत. ५४ सामन्यांच्या टी-२० कारकिर्दीत त्यांच्या नावावर ४२ विकेट्स आणि ३७७ धावा आहेत.

अवामी लीगचे नेते शाहीन चकलादार यांचे हॉटेल पेटवले

जेसोर येथेही आंदोलकांनी एका हॉटेलला आग लावली. यामध्ये आठ लोक जिवंत जळाले तर इतर ८४ जण गंभीर जखमी झाले आहे. अवामी लीगचे नेते शाहीन चकलादार यांचे ते हॉटेल होते. चकलादार जेसोर जिल्ह्याचे अवामी लीगचे महासचिव आहेत. पोलीस उपायुक्त अबरारूल इस्लाम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सार्वजनिक रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा