बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकीब अल हसन हा अडचणीत आला असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. रुबेल नावाच्या व्यक्तीचा एडबोरमधील निषेध मोर्चादरम्यान गोळी लागून मृत्यू झाला होता. यानंतर मृत रुबेलचे वडील रफीकुल इस्लाम यांनी ढाका येथील एडबोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला.
क्रिकेटपटू शकीब अल हसनसह बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद याच्यावरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकीब हा या प्रकरणातील २८ वा आरोपी आहे तर फिरदौस हा ५५ वा आरोपी आहे. तसेच या प्रकरणात इतर आरोपींमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना, ओबेदुल कादर आणि अन्य १५४ जणांचा समावेश आहे. या सर्वांवर हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
जानेवारी महिन्यामध्ये अवामी लीगच्या तिकिटावर शकीब अल हसन आणि फिरदौस अहमद खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर या दोघांनाही खासदारकी गमवावी लागली. शकीब अल हसन हा सध्या क्रिकेट मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन हा नेहमीच त्याच्या कृत्यांमुळे चर्चेत आणि वादात असतो. त्याने अनेकवेळा मैदानात पंचांशी गैरवर्तन केले आहे.
हे ही वाचा :
अनिल अंबानींवर सेबीची कारवाई; पाच वर्षांसाठी बंदी, ठोठावला २५ कोटींचा दंड
‘४० आमदार सोडून गेल्याने उद्धव ठाकरे अजून ट्रॉमात’
कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे स्वीकारले अध्यक्षपदासाठीचे नामांकन
रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूर बंद !
प्रकरण काय?
५ ऑगस्ट रोजी, रुबेल याने एडबोरमधील रिंग रोडवरील निषेध मोर्चात भाग घेतला होता. या मोर्चादरम्यान, सुनियोजित गुन्हेगारी कटाचा भाग म्हणून कोणीतरी जमावावर कथित गोळीबार केला. यादरम्यान, रुबेलच्या छातीत आणि पोटात गोळी लागली. यानंतर रुबेलला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र ७ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.