बांगलादेशमध्ये आरक्षण रद्द करा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर तिथे सत्तांतर झाले. या सगळ्या अराजकात तेथील हिंदूंवर पुन्हा एकदा अनन्वित अत्याचार झाले. त्यामुळे भारताने बांगलादेशला विनंतीवजा इशाराच दिला. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बांगलादेशचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांचा फोन आला आणि त्यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. नरेंद्र मोदी यांनीच आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली.
बांगलादेशमधील अल्पसंख्यांक असुरक्षितपणे वावरत आहेत. त्यामुळे हिंदू समुदायाबाबत भारताने वारंवार चिंता प्रकट केली. या दरम्यान बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले आहे की, बांगलादेश सरकारचे सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली. सद्यस्थितीवर त्यांनी माहिती दिली. मोहम्मद युनूस यांनी लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या सहकार्य मिळावे याचा पुनरुच्चार केला. बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची, सुरक्षिततेची आणि संरक्षणाची ग्वाही त्यांनी दिली. बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच युनूस यांनी मोदी यांना फोन करून भारताच्या सहकार्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ममता बॅनर्जींकडे मागितला न्याय
खार जिमखान्याच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त २८ खेळाडूंना जीवनगौरव
अडीच वर्षांच्या संघर्षाला यश आल्याने समाधान
समान नागरी कायदा, मोदींनी लाल किल्ल्यावरून शड्डू ठोकले…
बांगलादेशात आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना पळ काढावा लागला. त्या भारतात आता शरण आलेल्या आहेत. त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या घडामोडीननंतर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले असून त्याचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस आहेत.
युनूस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, पंतप्रधान मोदी यांनी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त केली होती. बांगलादेशात १९५१मध्ये २२ टक्के हिंदू होते पण उत्तरोत्तर हिंदूंची संख्या कमी होत गेली. आज तिथे ८ टक्क्यांपेक्षा कमी हिंदू आहेत.
या आंदोलनानंतर हिंदूंवर जे अत्याचार झाले, त्यानंतर तेथील हिंदू समाजही संतप्त होऊन रस्त्यावर उतरला होता. त्याची दखल जगभरात घेतली गेली. वेगवेगळ्या ठिकाणी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आंदोलने केली गेली, निषेध मोर्चे काढले गेले.