बांगलादेशचे राजदूत म्हणतात, युनूस सरकारमुळे देशात अराजक, हिंदूंवर अत्याचार

मोरोक्कोमधील राजदूतांनी सोशल मीडियावर मांडली व्यथा

बांगलादेशचे राजदूत म्हणतात, युनूस सरकारमुळे देशात अराजक, हिंदूंवर अत्याचार

मोरोक्कोमधील बांगलादेशचे राजदूत हारुन अल रशीद यांनी देशातील स्वतःच्या सरकारवरचं टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बांगलादेशमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यावर हारुन अल रशीद यांनी देशात अराजकता पसरवणे, धर्मनिरपेक्ष संरचना मोडणे, कट्टरपंथीयांना पाठिंबा देणे आणि शेख हसीना सरकार उलथवून टाकण्याचा कट रचणे असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. रशीद म्हणाले आहेत की बांगलादेशमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे आणि देश दररोज खोलवर बुडत आहे परंतु जग सर्व काही पाहत असूनही गप्प आहे. त्यांनी पाश्चात्य देशांना युनूस सरकार विरुद्ध कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे.

हारून अल रशीद यांनी सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट करत त्यांचू भूमिका मांडली आहे. त्यांनी दावा केला आहे की, बांगलादेश पूर्णपणे दहशतवाद आणि अराजकतेच्या विळख्यात सापडला आहे. युनूसच्या राजवटीत माध्यमांना दडपण्यात आले आहे आणि अत्याचारांचे वृत्त समोर येत नाही. यामुळे कट्टरपंथीयांना मोकळीक मिळाली आहे. युनूसच्या देखरेखीखाली, कट्टरपंथी बांगलादेशची धर्मनिरपेक्ष आणि सांस्कृतिक ओळख पुसून टाकत आहेत. हे लोक केवळ संग्रहालये, पुतळे आणि सांस्कृतिक प्रतीके नष्ट करत नाहीत तर त्यांनी शेकडो सूफी मंदिरे आणि हिंदू मंदिरे देखील उद्ध्वस्त केली आहेत.

युनूसच्या राजवटीत महिलांना सर्वाधिक अत्याचार सहन करावे लागत असल्याचे हारून म्हणतात. अल्पसंख्याक आणि धर्मनिरपेक्ष लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. हिज्बुत-तहरीर, इस्लामिक स्टेट आणि अल कायदा सारख्या संघटना उघडपणे इस्लामिक राजवटीची मागणी करत आहेत. जुलैमध्ये हसीनाचे सरकार उलथवून टाकल्यापासून हे लोक देशाच्या रचनेला कमकुवत करत आहेत, असा आरोप रशीद यांनी केला आहे.

रशीद म्हणतात की युनूस सरकार त्यांच्यावर रागावले आहे कारण त्यांनी बंगबंधू मुजीबुरहमान यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांवर एक बंगाली कादंबरी लिहिली होती. रशीद लिहितात की बांगलादेशची निर्मिती धर्मनिरपेक्ष देश म्हणून झाली होती पण इस्लामवादी ही ओळख नष्ट करण्याचा कट रचत आहेत. ते म्हणाले की, देशाचे संस्थापक शेख मुजीबुरहमान आणि त्यांची मुलगी शेख हसीना दोघेही अतिरेक्यांचे बळी होते.

हे ही वाचा : 

राऊतांनी रोज सकाळी ९ वाजताचा शिमगा बंद करुन महाराष्ट्राच्या हितासाठी सूचना कराव्यात

पंजाब: शिवसेना जिल्हाध्यक्षाची गोळीबारात हत्या, एक अल्पवयीन मुलगाही जखमी!

१९ मार्चपूर्वी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येण्याची शक्यता नाहीच

देशभरात होळीचा उत्साह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा!

बांगलादेश सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये मोहम्मद हारुन अल रशीद यांची मोरोक्कोमध्ये बांगलादेशचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. मोहम्मद हारुन अल रशीद हे बांगलादेश सिव्हिल सर्व्हिस (परराष्ट्र व्यवहार) केडरच्या २० व्या बॅचमधून आले आहेत. २००१ मध्ये सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी कॅनडामधील बांगलादेश उच्चायुक्तालयात मंत्री आणि उपउच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे. त्यांनी रोम, कैरो, मेक्सिको सिटी आणि माद्रिद येथील बांगलादेश मिशनमध्ये विविध पदांवर काम केले आहे.

ॲड. पुनाळेकर यांना दाभोळकर प्रकरणात कशी झाली अटक आणि सुटका? महामुलाखत (पूर्वार्ध) | Dinesh Kanji |

Exit mobile version