अफगाणिस्तानात महिलांवर नवे बंधन; बाग, हिरवळ असलेल्या उपाहारगृहात बंदी

पुरुषांसोबत जेवण घेण्याविरोधात केला नियम

अफगाणिस्तानात महिलांवर नवे बंधन; बाग, हिरवळ असलेल्या उपाहारगृहात बंदी

तालिबान महिलांवर एका पेक्षा एक कठोर नियम लागू करत आहेत. महिला आपल्या हक्कांसाठी लढत असताना त्यांच्यावर आणखी एक नवे बंधन घालण्यात आले आहे.

अफगाणिस्तान उत्तर-पश्चिम मधील हेरात या प्रांतात परिवार आणि महिलांना हिरवळी किंवा बाग असलेल्या उपाहारगृहात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याकडून असे सांगण्यात आले की हा निर्णय आम्ही धार्मिक विद्वान आणि तेथील स्थानिकांनी पुरुष महिला एकत्र येण्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर घेण्यात आला आहे. २०२१ मध्ये सत्ता स्थापन झाल्यापासून तालिबानने महिलांवर कठोर नियम लागू केले आहेत. सर्वप्रथम तालिबानने मुली आणि महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली. नंतर संयुक्त राष्ट्रात नोकरी आणि रोजगारावर बंदी आणली. तसेच बागेत आणि व्यायामशाळेत जाण्यावरही बंदी घालण्यात आली.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे बांधावर कधी जाणार? विरोधक घरी बसून असल्याबद्दल टीका

शरद पवारच म्हणत आहेत, राजीनामा देण्यापूर्वी ठाकरेंनी विचारायला हवे होते!

महाराष्ट्रात वाघांची संख्या पोहोचली चारशेच्या आसपास

सावरकर जयंती आता स्वातंत्र्यवीर गौरव दिन!

अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की जिथे महिला आणि पुरुष यांचे येथे एकत्र बसणे असते तिथे महिला हिजाब योग्य पद्धतीने परिधान करत नाहीत. ही बंदी फक्त हेरात येथील महिलांसाठी असून पुरुषांसाठी हे परिसर खुले असतील. हेरात येथील सांस्कृतिक विभागाचे अधिकारी बाज मुहंमद नाजीर म्हणतात, आम्ही सर्व ठिकाणी बंदी आणलेली नाही तर फक्त महिला आणि पुरुष ज्या ठिकाणी एकत्र बसू शकतील अशा बागेत, लॉन असलेल्या उपाहारगृहात घातली आहे.

परदेशी चित्रपट, टीव्ही शो आणि संगीताच्या डीव्हीडीच्या विक्रीवर बंदी घातल्याच्या वृत्ताचेही नाझीरने खंडन करत त्यांनी सांगितले की, मालकांना फक्त सामग्री विकण्याविरुद्ध आम्ही समज देत आहोत. कारण ते इस्लामच्या मूल्यांच्या विरोधात आहे. ज्या दुकानदारांनी सल्ल्याचे पालन केले नाही त्याची दुकाने बंद करण्यात आली आहेत.

 

Exit mobile version