राज्यासह देशांत होळी आणि धुलिवंदनचा सण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करतात. राज्यातल्या विविध भागात होळी आणि धुलीवंदन या सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यांत ५ ते ११ मार्च २०२३ साठी कठोर नियम पाळावेच लागणार आहेत. त्यासाठीच मुंबई पोलिसांनी यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन नियमावली जाहीर केली आहे.
होळी आणि धुलिवंदनाची नियमावली जाहीर
१ अश्लील शब्द किंवा सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे
२ हावभाव किंवा नकलेचा वापर आणि चित्रे, चिन्हे , फलक, किंवा इतर कोणत्याहि वस्तू गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करणे, ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा , सभ्यता किंवा नैतिकता, दुखावते
३ पादचाऱ्यांवर रंगीत पाणी , रंग, किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे.
४ रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे आणि किंवा फेकणे आणि जो कोणी आदेशाचे उल्लंघन करेल किंवा आदेशाचे उल्लंघन करण्यास मांडत करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा केली जाईल.
हे ही वाचा:
मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक
‘भगूर’ १५ दिवसात होणार पर्यटन स्थळ
काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, आणखी एक काश्मिरी पंडिताची हत्या
अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल
सार्वजनिक ठिकाणी अंदाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते म्हणूनच अशी नियमावली मुंबई पोलिसांकडून जारी करण्यांत आली आहे. या आदेशाचे कोणीही उल्लंघन केले किंवा आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत केली तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र असणार आहेत. हे आदेश आणि नियम दिनांक पाच मार्च २०२३ ते ११ मार्च २०२३ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यांत आल्याचे परिपत्रक मुंबई पोलीस आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.