25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियाहिजाबशिवाय अभिनेत्रीचे पोस्टर; इराणमध्ये चित्रपट महोत्सवावरच बंदी

हिजाबशिवाय अभिनेत्रीचे पोस्टर; इराणमध्ये चित्रपट महोत्सवावरच बंदी

‘द डेथ ऑफ याज’ या चित्रपटातील अभिनेत्री सुसान तस्लिमीचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर आली बंदी

Google News Follow

Related

हिजाब न घातलेल्या अभिनेत्रीचे प्रसिद्धी पोस्टर प्रसिद्ध करणाऱ्या चित्रपट महोत्सवावर इराणी अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे, अशी माहिती स्थानिक प्रसार माध्यमांनी दिली. इराणी शॉर्ट फिल्म असोसिएशन (आयएसएफए) ने आगामी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलच्या पोस्टरवर १९८२च्या ‘द डेथ ऑफ याज’ या चित्रपटातील इराणी अभिनेत्री सुसान तस्लिमीचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर ही बंदी आली आहे.

 

स्थानिक वृत्तसंस्था आयआरएनएने शनिवारी रात्री उशिरा दिलेल्या वृत्तानुसार, कायद्याचे उल्लंघन करून पोस्टरवर हिजाबशिवाय महिलेचा फोटो वापरण्यात आल्याने सांस्कृतिक मंत्र्यांनी वैयक्तिकरीत्या १३व्या आयएसएफए चित्रपट महोत्सवावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. हा महोत्सव सप्टेंबरमध्ये होणार होता.

 

इराणमध्ये १९७९मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर १९८३ पासून महिलांसाठी हिजाब घालणे, डोके आणि मान झाकणे अनिवार्य केले आहे. तथापि, हिजाबची सक्ती संपुष्टात आणण्यासाठी गेल्या सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली आहेत. अनेक इराणी महिला ड्रेस कोडच्या कठोर नियमांचे उल्लंघन करत आहेत.

हे ही वाचा:

पत्नी आणि पुतण्यावर गोळी झाडून सहाय्यक पोलीस आयुक्तांची आत्महत्या

बरेली येथे कावडियांवर दगडफेक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, माजी सहसरकार्यवाह, अभाविपचे संघटन मंत्री मदनदास देवी यांचे निधन

इराणकडून स्वीडन आणि डेन्मार्कमधील उत्पादनांवर बहिष्काराचे आवाहन

२२ वर्षीय इराणी कुर्द महिला महसा अमिनी हिने हिजाब नीट न घातल्यामुळे तथाकथित नैतिकता पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर तिचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात सरकारच्या कठोर नियमांविरोधात देशभर निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना पकडण्यासाठी पुन्हा गस्त सुरू केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा