बामियान बुद्ध लेण्यांच्या जागी आता ‘शूटिंग रेंज’

बामियान बुद्ध लेण्यांच्या जागी आता ‘शूटिंग रेंज’

तालिबानने बामियानमधील गौतम बौद्धाचा पुतळा उडवून दिल्याची घटना आपल्याला सर्वांना माहिती आहेच. परंतु आता त्याच बामियानमध्ये तालिबानने ‘शूटिंग रेंज’ म्हणजेच नेमबाजी साठी राखीव तथेवलेली जागा बनवली आहे. ऑगस्ट महिन्यात याच जागेवर तालिबानने हजारा समाजातील एका नेत्याचा पुतळा उध्वस्त केल्याची माहिती समोर आली होती. अब्दुल अली माझारी या हजारा समाजातील नेत्याची तालिबानने १९९५ साली हत्या केली होती. २००१ साली तालिबानची सत्ता गेल्यानंतर हजारा समाजाने त्यांच्या या नेत्याचा पुतळा बांधला होता. आता बौद्ध समाज आणि हजार समाजाचा अपमान करण्यासाठी तालिबानने याच जागेवर ‘शूटिंग रेंज’ सुरु केली आहे.

हजार समाजाला तालिबान आणि कट्टर मुसलमान काफिर समजतात म्हणजेच खरे मुसलमान समजत नाहीत. त्यामुळे हिंदू, शीख आणि इतर मुसलमान नसलेल्या समाजांना ज्या पद्धतीने तालिबान क्रूरतेने मारून टाकतात, तसेच ते मुसलमान असलेल्या हजारा समाजालाही संपवू इच्छितात.

“तालिबानवर विश्वास केला जाऊ शकत नाही. ते आत्ता काहीतरी बोलतील आणि नंतर त्यांना हवं तेच करतील.” असं वक्तव्य खुद्द खान अब्दुल गफ्फार खान यांच्या नातीने केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि इतर देशांच्या नेत्यांना अफगाणिस्तानच्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

हक्कानी नेटवर्कच्या ‘या’ नेत्याचा काबूलमध्ये खात्मा

ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक

फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू

स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक

तालिबानने गेले काही दिवस महिलांना अधिकार देणार, हिंदू आणि शिखांना घाबरण्याचे कारण नाही, सरकारी कर्मचाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही, अशा पद्धतीची वक्तव्य करून ‘पी.आर.’ कँपेन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच खान अब्दुल गफ्फार खानांच्या नातीचे हे वक्तव्य महत्वाचे आहे.

Exit mobile version