पाकिस्तानला दहशतवादाने पछाडले, चीनच्या गुंतवणुकीच्या विरोधात दुसरा हल्ला

बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए)च्या माजिद ब्रिगेडने हल्ला केला

पाकिस्तानला दहशतवादाने पछाडले, चीनच्या गुंतवणुकीच्या विरोधात दुसरा हल्ला

पाकिस्तानच्या अशांत बलूचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदलाच्या हवाईतळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या सुरक्षारक्षकांनी चार दहशतवाद्यांना ठार केले पण पाकिस्तान गेल्या काही काळापासून दहशतवादाने पछाडलेला असल्याचे दिसून येत आहे.

सुरुवातीला आलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पाकिस्तानचा सर्वांत मोठा दुसऱ्या क्रमांकाचा नौदल हवाईतळ पीएनएस सिद्दीक याच्यावर हल्ला केला. दोन्ही ठिकाणी गोळीबार आणि स्फोट झाल्याची सूचना मिळाली. दहशतवादी हल्ल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी तुर्बतमधील रुग्णालयांत आपत्कालीन परिस्थिती असल्याचे जाहीर करून सर्व डॉक्टरांना त्वरित कर्तव्यावर हजर राहण्याचे निर्देश दिले.

बीएलएच्या माजिद ब्रिगेडने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

प्रतिबंधित बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए)च्या माजिद ब्रिगेडने तुर्बतमधील नौदलाच्या हवाईतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. माजिद ब्रिगेडचा बलूचिस्तान प्रांतातील चीनच्या गुंतवणुकीला विरोध आहे. चीन आणि पाकिस्तान येथील संसाधनांचा दुरुपयोग करत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यांचे अनेक सैनिक हवाईतळात घुसले असल्याचा दावा बीएलएने केला आहे. या हवाईतळावर चिनी ड्रोनसुद्धा तैनात आहेत.

हे ही वाचा:

“कुंभकर्ण म्हणेल, मी सहा महिने झोपायचो काँग्रेसवाले वर्षभर झोपतात”

गाझामधील युद्धबंदीचा संयुक्त राष्ट्रांचा ठराव; इस्रायलची अमेरिकेवर टीका

आयपीएलचा सूर्या उशीरा उगवणार!

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची कमाई ११ कोटी पार

२० मार्च रोजी ग्वादार बंदरावर झाला होता हल्ला

याआधी, २० मार्च रोजी बीएलएच्या माजित ब्रिगेडने बलुचिस्तानस्थित ग्वादर पोर्ट ऑथोरिटी कॉम्प्लेक्समध्ये दहशतवादी हल्ला केला होता. त्यात दोन पाकिस्तानी सैनिक आणि आठ दहशतवादी मारले गेले होते.

चीनसोबतच्या भागीदारीमुळे ग्वादर बंदराची निर्मिती

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी ग्वादर बंदर महत्त्वपूर्ण आहे. या अंतर्गत अब्जावधी डॉलर किमतीचे रस्ते आणि ऊर्जाप्रकल्प उभारले जाणार आहेत.

Exit mobile version